फिटनेस बॉईज फाउंडेशन तलोधी(मो) द्वारा छत्रपति शिवाजी महाराजांवर आधारित सामान्य ज्ञान स्पर्धा

120

आज दिनांक 11/02/2024 रोज रविवारला फिटनेस बॉईज फाउंडेशन तलोधी(मो) द्वारा छत्रपति शिवाजी महाराजांवर आधारित सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आली.यामध्ये जा.कृ.बोमनवार हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय चामोर्शी या परीक्षा केंद्रावर उत्स्पूर्थ प्रतिसाद स्पर्धकांकडून मिळालं या परीक्षा केंद्रावर 250 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला या परीक्षेकरिता 18 वर्षापर्यंत वयोगट ठेवण्यात आले होते..

यात परीक्षा केंद्र संचालक म्हणून जा.कृ.बोमनवार शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक – इतेंद्र चांदेकर सर यांनी काम पाहिले.

परीक्षा प्रमुख म्हणून – अंकुश संतोषवार(फिटनेस बॉईज फाउंडेशन अध्यक्ष)यांनी काम पाहिले.

परीक्षा पर्यवेक्षक म्हणून – संतोष राजकोंडावार,गोविंदा कुनघाडकर आकाश नेवारे,अभिषेक कोत्तावर,सारंग भांडेकर,हिमांशू संतोषवार,राहुल सोनकुसरे,नयन खोब्रागडे यांनी काम पाहिले…

या परीक्षेसाठी नोमेश उरकुडे सर व घनश्याम मनबत्तुलवार सर यांनी सहकार्य केले तसेच ही परीक्षा शहीद बाबुराव शेडमाके हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय(आमगाव म) व राजे धर्मराव हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय(तलोधी मो) या परीक्षा केंद्रावर सुद्धा घेण्यात आली…