*रोटरी उत्सव हा गडचिरोली शहरवासीयांसाठी आनंद उत्सवाची पर्वणीच:-सौ.योगीताताई पिपरे*

45

*रोटरी उत्सव हा गडचिरोली शहरवासीयांसाठी आनंद उत्सवाची पर्वणीच:-सौ.योगीताताई पिपरे*

 

*रोटरी क्लब गडचिरोली तथा इनरव्हिल क्लब गडचिरोली यांच्या वतीने रोटरी उत्सव*

 

*गडचिरोली:- दि.१० फेब्रुवारी*

 

*रोटरी क्लब गडचिरोलीच्या वतीने गडचिरोली शहरात भव्य स्वरूपात रोटरी उत्सव आयोजित केलेला आहे.ज्यामध्ये अनेक प्रकारचे स्टॉल लावण्यात आलेले आहेत,विशालमेला चे आयोजन करण्यात आले आहे. जेणेकरून गडचिरोली शहरवासींना याचा आनंद घेता येईल. म्हणून रोटरी उत्सव हा गडचिरोली शहरवासियांसाठी आनंद उत्सवाची पर्वणीच घेऊन आलेला आहे.असे प्रतिपादन भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ.योगिताताई पिपरे यांनी केले.रोटरी क्लब गडचिरोली तथा इनरव्हिल क्लब गडचिरोली यांच्या वतीने देवकुले ग्राउंड,हॉटेल लँडमार्क जवळ चंद्रपूर रोड गडचिरोली येथे भव्य रोटरी उत्सव आणि विशालमेला चे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या.*

*कार्यक्रमाचे उद्घाटन संघचालक जिल्हाध्यक्ष घिसुलालजी काबरा यांच्या हस्ते करण्यात आले.तर प्रमुख अतिथी म्हणून भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे,रोटरी क्लबचे अध्यक्ष नंदुभाऊ काबरा,रोटरी क्लबचे सचिव कविताताई मोहरकर, बि फॅशन प्लाझा चे संचालक मनोजभाऊ देवकुले, दिवाकरजी बारसागडे,प्रकल्प निर्देशक सुनील बट्टूवार,लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे व रोटरी क्लबचे सभासद उपस्थित होते.*