हनुमान वार्ड गडचिरोली येथे ओबीसीची कॉर्नर सभा.
मोर्चात हजारोच्या संख्येने सहपरिवार सहभागी होणार .
गडचिरोली:– ओबीसी प्रवर्गाच्या विविध प्रलंबित संविधानिक मागण्या घेऊन ओबीसी समाजाचा महाविशाल मोर्चा 22 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये गडचिरोली शहरातील हनुमान वॉर्डातून हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्धार नुकताच एका सभेमध्ये ओबीसी समाजाच्या बांधवानी केला आहे. यावेळी नगराध्यक्ष योगिताताई पीपरे,प्रा.शेषराव येलेकर नगरसेवक मुक्तेश्वर काटवे,रमेश भुरसे, केशव निंबोळ, प्रा.देवानंद कामडी,सुरेश भांडेकर, दुर्गा का टवे , सह ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेमध्ये मोर्चाच्या प्रमुख मागण्या, समाज संघटन , मोर्चाच्या प्रवासाचे नियोजन मोर्चाची प्रचार प्रसिद्धी यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. तालुक्यातील ग्रामीण भागात गावा गावात जाऊन लोकांमध्ये ओबीसी प्रवर्गाचे प्रश्न , आरक्षण , जनगणना इत्यादी प्रश्न मार्गी लागण्यासाठी शासन स्तरावर दबाव वाढवण्यासाठी हजारोच्या संख्येने ओबीसी बांधव मोर्चात सहभागी होण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.







