राष्ट्रीय ओबीसी महासंघ आष्टीच्या वतीने 22 फेब्रुवारीच्या ओबीसी महामोर्चाबाबत जनजागृती व मार्गदर्शन सभा.

141

राष्ट्रीय ओबीसी महासंघ आष्टीच्या वतीने 22 फेब्रुवारीच्या ओबीसी महामोर्चाबाबत जनजागृती व मार्गदर्शन सभा.

आष्टी परिसरातील गावागावात सभा, बैठकांचे आयोजन करून केले महामोर्चात सामील होण्याचे आवाहन.

आष्टी-
ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे या प्रमुख मागणीसह इतर न्याय हक्काच्या मागणीसाठी 22 फेब्रुवारी रोजी गडचिरोली येथे ओबीसी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले.या महामोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघ आष्टीच्या वतीने आष्टी परिसरातील गावागावात जाऊन ओबीसी समाजाच्या बैठकीत ओबीसींच्या न्याय हक्कासाठी लढा देण्याचे आवाहन करण्यात आले.

आष्टी,इल्लूर, अनखोडा,ठाकरी, कुनघाडा,मार्कंडा,कढोली,उमरी, चंदनखेडी आदी गावात जाऊन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी ओबीसींच्या हक्काच्या न्याय मागण्यासाठी समाज संघटित होणे काळाची गरज आहे जोपर्यत संघटित येऊन आपल्या हक्कासाठी लढत नाही तोपर्यंत आपल्या पदरात काहीही पडणार नाही.याबत सभा, बैठका घेऊन व मार्गदर्शन करून 22 फेब्रुवारीला गडचिरोली येथे होणाऱ्या विराट ओबीसी महामोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले.
आष्टी परिसरातील ओबीसी समाजबांधव सुद्धा याला उत्तम प्रतिसाद देत या महामोर्चात सहभागी होणार असल्याचे जाहीर केले.
यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघ आष्टीचे अध्यक्ष प्रा. हिरादेवे,प्रा. बोरकुटे, प्रा. इंगोले, प्रा.थेरे, प्रा. तिवाडे, प्रा. धोटे,पाटील सर, बोलगोडवार सर आदी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम व सहकार्य केले.