*राजमुद्रा फाउंडेशन एटापल्ली यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी*

81

*राजमुद्रा फाउंडेशन एटापल्ली यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी*

 

*गरीब व गरजू नागरिकांना जीवणावश्यक साहित्य वाटप,ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप,*

 

राजमुद्रा फाउंडेशन एटापल्ली यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

त्या निमित्त तुमरगुंडा,जीवनगट्टा, एटापल्ली गावातील काही गरीब व गरजू नागरिकांना अन्न धान्याचे किट वाटप करण्यात आले.

व दुपारला 2 वाजता ग्रामीण रुग्णालय एटापल्ली येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. सायंकाळी 5 वाजता महाप्रसाद वितरित करण्यात आले.व सायंकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वारोहण करण्यात आले.व त्या नंतर एटापल्ली शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत राजमुद्रा फाउंडेशन चे अध्यक्ष अनिकेत मामिडवार, उपाध्यक्ष मनीष धाली,सचिव अविष्कार गड्डमवार व संपूर्ण सदस्य उपस्थित होते.

व एटापल्ली शहरातील प्रतिष्ठत नागरिक होते.संपूर्ण मिरवणुकीत पोलिस प्रशासनाने सहकार्य केले.