*पोलीस भरतीमध्ये जिल्ह्यातील खुला प्रवर्ग व ई डब्ल्यू एस प्रवर्गाला स्थान देण्यात यावा व ओ. बी. सी. युवकांना जागा वाढवुन द्याव्यात अन्यथा गडचिरोली जिल्ह्यात विराट आंदोलन* – *आशिष पिपरे नगरसेवक चामोर्शी*
*!गेल्या तीन वर्षापासून ओ. बी. सी. खुला प्रवर्ग व ई डब्ल्यू एस प्रवर्गावर राज्य शासनाचा अन्याय!*
*चामोर्शी – दिनांक 3 मार्च 2024*
*नुकताच गडचिरोली जिल्ह्यातील विविध गावातील खुल्या प्रवर्गातील व ई डब्ल्यू एस प्रवर्गातील शेकडो बंगाली* *युवकांनी चामोर्शी येथील भाजपा सहकार आघाडीचे जिल्हा अध्यक्ष नगरसेवक आशिष भाऊ पिपरे व व भाजपा बंगाली आघाडी जिल्हा संयोजक रमेश अधिकारी यांची भेट घेऊन खुला प्रवर्ग व ई डब्ल्यू एस प्रवर्गावर झालेल्या* *अन्यायाबाबत सविस्तर चर्चा केली व निवेदन दिले आणि निवेदनाद्वारे त्यांनी कळवले की गेल्या तीन वर्षापासून जिल्ह्यातील पोलीस भरती मध्ये खुला प्रवर्ग व ई डब्ल्यू एस प्रवर्गाला एकही जागा नाही ? व या प्रवर्गातील शेकडो युवक गेल्या अनेक वर्षापासून पोलीस भरतीची तयारी करत आहेत* *परंतु भरतीमध्ये कुठलाही स्थान नसल्याने त्यांचा हिरमोड झाला आहे व निवेदनाद्वारे मागणी केली गडचिरोली जिल्ह्यात पोलीस भरतीत 742 जागासाठी भरती पार पडणार आहे परंतु या पोलीस भरती खुल्या प्रवर्गातील व ई डब्ल्यू एस प्रवर्गातील एकाही युवकाला स्थान दिला गेला नाही ही शोकांतिका आहे* *याबाबत लोकप्रतिनिधींना अवगत केला परंतु येथील लोकप्रतिनिधी सुद्धा मूंग गिळून गप्प आहेत* *यावेळी नगरसेवक आशिष भाऊ पिपरे यांनी प्रश्न उपस्थित केला की गडचिरोली जिल्ह्यातील ओ. बी. सी. खुला प्रवर्ग व ई डब्ल्यू एस प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगार यांचा वाली कोण याबाबत नगरसेवक आशिष भाऊ पिपरे यांनी खासदार अशोक भाऊ नेते यांच्याशी चर्चा केली व आज या विषयावर गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक भाऊ नेते यांचे मार्गदर्शनात त्यांचे गडचिरोली येथील* *निवासस्थानातील कार्यालय येथे महत्त्वाची बैठक ठेवण्यात आली आहे या विषयावर बोलताना आशिष भाऊ पिपरे यांनी सांगितले की खुला प्रवर्ग व ई डब्ल्यू एस प्रवर्गाला व ओ. बी. सी. युवकांना गडचिरोली जिल्ह्यात न्याय न मिळाल्यास जिल्ह्यात विराट आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा दिला व वेळ पडल्यास न्याय मागण्यासाठी उच्च न्यायालयात दाद मागण्याची तयारी सुद्धा आशिष भाऊ पिपरे यांनी केली आहे आता या विषयावर खासदार अशोक भाऊ नेते यांच्या* *मार्गदर्शनात पुढील वाटचालीची दिशा ठरवण्यात येणार आहे*