*नारी शक्ती वंदन मॅरेथॉन दौड स्पर्धेत जिल्ह्यातील १८ वर्षावरील सर्व महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.:- सौ.योगीताताई पिपरे*
*गडचिरोली:- दि.३ फेब्रुवारी*
*रन फॉर नेशन,रन फॉर मोदी या उपक्रमाअंतर्गत गडचिरोली शहरात नारी शक्ती वंदन भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेची सुरवात ४ मार्च २०२४ रोजी सकाळी ७.०० वाजता इंदिरा गांधी चौक ते आयटीआय चौक पर्यंत स्पर्धा घेण्यात येत आहे.या स्पर्धेत १८ वर्षावरील सर्व नवमतदार विध्यार्थीनी,NCC महिला,बचत गटाच्या महिला,एनजिओच्या महिला व जिल्ह्यातील अन्य सर्व महिलांनी मॅरेथॉन दौड स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भाजपा जिल्हा महामंत्री सौ.योगीताताई पिपरे यांनी केले आहे.*
*या स्पर्धेचे शुभारंभ मा. खासदार अशोकजी नेते,आमदार डॉ. देवरावजी होळी, आमदार कृष्णाजी गजभे,जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे,लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम,जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा,जिल्हा महामंत्री सदानंदजी कुथे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष गिताताई हिंगे यांच्या शुभ हस्ते होणार आहे.*
*मॅरेथॉनमध्ये सहभागी स्पर्धकांना प्रथम पारितोषिक ७००१ रुपये,द्वितीय पारितोषिक ५००१,तृतीय पारितोषिक ३००१ रुपये तसेच सहभागी स्पर्धकांना विशेष पारितोषिक म्हणून प्रोत्साहनपर बक्षीस २ प्रत्येकी १००० रुपये याप्रमाने पारितोषिक आयोजित केलेले आहे.*