सोनापूर क्रांसिंग जवळ जिंदाल स्टील ट्रकने घेतला एकाच बळी, एक गंभीर
चामोर्शी :- चामोर्शी तालुका मुख्यालयापासून ५ किलोमीटर अंतरावरील सोनापूर क्रासिंग जवळ दिनांक ४ मार्च रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजताच्या सुमारास अपघात झाला असून, सुरेश महादेव दुधबावरे, रा – सोनापूर हे आपल्या काही कामा निमित्य MH३३ Z 6877 या दुचाकीने चामोशीला गेले असता येतांना सोनापूर क्रासिंग जवळ जिंदाल स्टील कंपनीच्या ट्रक CG ०७,BG५५९७ ने बाईकला दिली धडक हा अपघात एवढा भयानक होता की इथे सुरेश दुधबावरे यांच्या जागीच मृत्यू झाला . तर लुकेश रामभाऊ दुधबावरे हे गंभीर जखमी आहे घटनेची माहिती मिळताच चामोर्शी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे पाठविण्यात आला असून पुढील तपास चामोर्शी पोलिस करीत आहेत