*_विजयी संकल्प करत पुन्हा एकदा कमळ फुलवा_…* *खा.नेते यांचे जाहीर सभेला प्रतिपादन..*

24

*_विजयी संकल्प करत पुन्हा एकदा कमळ फुलवा_…*

*खा.नेते यांचे जाहीर सभेला प्रतिपादन..*

—————————————-

*महायुतीच्या नेत्यांच्या संयुक्त प्रचारातून महाविजयाचा संकल्प काँग्रेसला शक्य झाले नाही ते मोदींनी करून दाखविले-मा.ना.आत्राम यांचे प्रतिपादन..*

 

(एटापल्ली-मुलचेरा-सुंदरनगर-

गोमनी.)

 

दि.०४ एप्रिल रोज गुरूवारी महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा विद्यमान खासदार अशोक जी नेते यांच्या प्रचारार्थ

एटापल्ली-मुलचेरा-सुंदरनगर-

गोमनी.या विविध ठिकाणी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.

 

*या जाहीर सभेला महायुतीचे उमेदवार तथा खा.अशोक नेते* यांनी संबोधीत करतांना म्हणाले

पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी दहा वर्षाच्या कार्यकाळात अनेक योजना कार्यान्वित करत आमलात आनण्याचे काम केले.केंद्र शासनाच्या संपुर्ण योजना व केलेल्या विकास कामाची माहिती देत अब कि बार चारसौ पार,फीर एक बार मोदी सरकार असा विजयी संकल्प करत पुन्हा एकदा कमळ फुलवा व भरगच्च मताने मला विजयी करा असे प्रतिपादन खा.नेते यांनी या जाहीर सभेच्या निमित्ताने आयोजित सभेला संबोधीत केले.

 

*यावेळी प्रचार सभेला मंत्री धर्मराव बाबा आत्राम* यांनी बोलतांना महायुतीचे अधिकृत उमेदवार अशोकजी नेते यांना १९ एप्रिल ला कमळाच्या चिन्हावर मतदान करुन निवडुन आणायचे आहे.काँग्रेसचे उमेदवार हे बाहेरचे पार्सल उमेदवार आहेत त्यांचा क्षेत्रांत काही लेने देने व लोकोपयोगी काम नाही. खा.नेते हे जनतेमध्ये राहून सतत प्रवास करत विकासाचे काम करणारे एकमेव उमेदवार आहेत.पंतप्रधान मोदी जी चे हात बळकट करण्यासाठी पुन्हा एखादा पंतप्रधान बनवायचे आहे. यासाठी कमळाच्या चिन्हावर मतदान करुन विजयी करा. असे प्रतिपादन या भव्य प्रचार सभेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी के‌ले आहे.

 

उन्हाच्या पाऱ्यासोबत लोकसभा निवडणुकीचेही वातावरण गरम होत आहे. भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना महायुतीचे उमेदवार तथा खासदार अशोक नेते यांच्या हॅटट्रिकसाठी महायुतीमधील तीनही पक्षांचे नेते, पदाधिकारी कामाला लागले आहेत. दक्षिण गडचिरोलीत अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम आणि अशोक नेते यांनी संकुक्तपणे दौरा करत महायुतीच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहण्याचे आवाहन केले.

 

एटापल्ली, मुलचेरा, गोमनी, सुंदरनगर येथे त्यांनी संयुक्तपणे जाहीर सभा घेतल्या. अहेरी विधानसभा मतदार संघाअंतर्गत येणाऱ्या या भागात दोन्ही नेत्यांनी त्यांच्या भागात केलेल्या कामांची आणि सहकारने राबविलेल्या योजनांची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हाथ बळकट करण्यासाठी आणि शेतकरी, बेरोजगारांच्या हितासाठी महायुतीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले

 

या जाहीर प्रचार सभेच्या बैठकीला प्रामुख्याने जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रवींद्र ओल्लालवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव ऋतुराज हल्लगेकर, युवा राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर,कि.मोर्चा प्रदेश सचिव रमेश भूरसे, जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे,राष्ट्रवादी नेते संजय चरडुके, तालुकाध्यक्ष प्रशांत आत्राम, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष श्रीकांत कोपूलवार,शहराध्यक्ष निखिल गादेवार,बं.आ‌.प्रदेश उपाध्यक्ष दिपक हलदार,जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश दता,तालुकाध्यक्ष संजय सरकार, बादल शहा,सुभाष गणपती, ज्योतीदीषठीर विशवास,विधान वैद्य, तसेच मोठ्या संख्येने महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सभेला उपस्थित होते.