ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत यांना अर्जातील कागदपत्रात
असलेल्या त्रुटीची पुर्तता करण्याचे आवाहन
गडचिरोली, (जिमाका) दि.30 : राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेअंतर्गत Mahakalasanman.org या संकेतस्थळावर सन 2024-25 या वर्षात ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत यांचे ऑनलाईन पध्दतीने प्राप्त झालेल्या अर्जातील कागदपत्रात असलेल्या त्रुटीची पुर्तता करण्याकरिता सदर यादी जिल्हातील पंचायत समिती, कार्यालय (सर्व), नगर पंचायत /नगर परिषद (सर्व ) यांचे नोटीस बोर्ड वर प्रकाशित करण्यात येत आहे. तसेच जिल्हा परिषद, गडचिरोली या कार्यालयाचे संकेतस्थळ https://zpgadchiroli.maharashtra.gov.in वर सुध्दा प्रकाशित करण्यात येत असुन अर्जातील कागदपत्रात असलेल्या त्रुटीची पुर्तता करण्याकरिता त्या ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत यांनी ते पुरावे /कागदपत्रे दिनांक 02.01.2026 शुक्रवार पर्यंत पंचायत विभाग, जिल्हा परिषद, गडचिरोली या कार्यालयात सादर करावे, मुदतीनंतर सादर केलेले पुरावे/कागदपत्रे स्विकार केल्या जाणार नाही याची नोंद घ्यावी. असे सदस्य- सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.), जिल्हा परिषद, गडचिरोली यांनी कळविले आहे.
0000





