*_उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेस माजी जि. प. सदस्य , सरपंच व उपसरपंच यांचा भाजपात पक्षप्रवेश._*
——————————————
*_जिल्हा अध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांच्या नेतृत्वावर विश्र्वास ठेऊन धानोरा येथील प्रचार सभेमध्ये घेतले पक्षप्रवेश._*
——————————————
दिनांक :- १४/०५/२०२४
धानोरा :- _राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्रजी फडणवीस व राज्याचे अन्न व प्रशासन मंत्री राजे धर्मराव बाबा आत्राम यांच्या उपस्थितीमध्ये व नेतृत्वाखाली आयोजित गडचिरोली चिमूर – लोकसभा क्षेत्राचे अधिकृत उमेदवार अशोकजी नेते यांच्या प्रचारार्थ धानोरा येथे प्रचार सभेमध्ये काँग्रेस माजी जिल्हा परिषद सदस्या सौ.वैशालीताई किरण ताटपल्लीवार, शिवनी येथील सरपंच किरणजी ताटपल्लीवार, माजी उपसरपंच घनश्यामजी गुरनुले ( शिवनी ) व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र गटाचे नेते नरेशजी कंदीकुलवार (येवली) यांनी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत शक्तिशाली देश बनत असून आत्मनिर्भरतीच्या दिशेने एक पाऊल आत्मविश्वासने टाकत आहे._ _विकसित भारताचा संकल्प घेऊन देश विकासाच्या व विश्वगुरू बनण्याच्या मार्गावर जात आहे. लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सबका साथ सबका विकासचा नारा देत गरीब, किसान, दलित, अल्पसंख्यांक आदिवासी, महिला यांच्याकरिता विविध प्रकारची योजना काढून त्यांना सन्मान दिले व त्यांना विकासाच्या मार्गावर घेऊन जात आहेत_.
*_राज्याचे विकास पुरुष, राज्याचे कणखरनेतृत्व माननीय उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्रजी फडणवीस व खासदार अशोकजी नेते, आमदार देवरावजी होळी, आमदार कृष्णाजी गजबे , माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज , माजी आमदार डॉ.नामदेवरावजी उसेंडी यांच्या कार्यकर्तृत्वावर व जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपामध्ये पक्षप्रवेश केला_*.
_त्याप्रसंगी मंचावर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्रजी फडणवीस राज्याचे अन्न व प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम, खासदार अशोकजी नेते, आमदार देवरावजी होळी, आमदार कृष्णाजी गजबे, माजी आमदार डॉ.नामदेवरावजी उसेंडी, जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, लोकसभा निवडणूक प्रमुख किसनजी नागदेवे, जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा, लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे, शिक्षणा जिल्हा प्रमुख हेमंत जम्बेवार, डॉ. मिलिंदजी नरोटे, जिल्हा उपाध्यक्ष शशिकांतजी साळवे, लीलाधर जी भरडकर, शहराध्यक्ष सारंगजी साळवे, महिला मोर्चा प्रदेश सचिव रेखाताई डोळस, डॉ.चंदाताई कोडवते तालुकाध्यक्ष लताताई पुंगाटी, डॉ.संगीताताई रेवतकर, वर्षाताई मोरे, भाजपा व महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते_.





