*अहेरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी*

23

*अहेरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी*

शहरातून भव्य बाईक व भीम रॅली काढण्यात आले

*माजी जि. प.अध्यक्षा भाग्यश्री ताई आत्राम सामील*

अहेरी नगरी दुमदुमले!

*अहेरी:-* 14 एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अहेरी शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आले. येथील बौद्ध विहाराच्या पटांगणात ज्ञान प्रसारक नवयुवक मंडळाच्या वतीने तर दीक्षा भूमी येथे बोधसत्व बहुद्देशीय सामाजिक विकास मंडळाच्या वतीने पंचशील ध्वज फडकविन्यात आले .

अहेरी शहरातून सकाळी भव्य बाईक तर सायंकाळी ज्ञान प्रसारक नवयुवक मंडळ व बोधिसत्व बहुद्देशीय सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त भव्य अहेरी शहरातून भव्य भीम रॅली काढण्यात आले.

दरम्यान जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षा भाग्यश्री ताई आत्राम यांच्या शुभहस्ते अहेरीच्या मुख्य चौकात केक कापून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.

भिमगितांवर भाग्यश्री ताई आत्राम यांचेही पाय थिरकले. अनेकांनी भिमगीतांवर ठेकाही धरले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषणी अहेरी शहर दुमदुमले.

यावेळी सुरेंद्र भाऊ अलोणे, सेवा निवृत्त प्राचार्य रतन दुर्गे, महेश अलोणे , रामचंद्र ढोलगे, कपिल ढोलगे, करन दहागावकर, राहुल गर्गम, कपिल ढोलगे, प्रणय अलोणे, कपिल दुर्गे, कपिल झाडे, छत्रपती गोवर्धन, हरिदास ओंडरे आदी व असंख्य समाज बांधव उपस्थित होते.