जिल्हातील उपक्रमशील शिक्षकांचा विनोबा ॲप मधील उत्कृष्ट कामगिरीचा सन्मान..

38

जिल्हातील उपक्रमशील शिक्षकांचा विनोबा ॲप

मधील उत्कृष्ट कामगिरीचा सन्मान..

 

 

जिल्हा परिषद, गडचिरोली व ओपन लिंक्स फाऊंडेशन यांच्यातील सामंजस्य कराराअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रम अर्थात विनोबा (बा) ऍप च्या माध्यमातून जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांना प्रत्येक महिन्यात प्रोत्साहनपर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.

 

 

गडचिरोली जिल्हा परिषदेच्या सभागृहात झालेल्या छोटेखानी समारंभात दोन शिक्षकांना मार्च २०२४ चे जिल्हास्तरीय विनोबाॲप पुरस्कार प्रदान करण्यात आले.

 

आज माननीय जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंघ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आशीष शेलार, भुयार साहेब उपशिक्षणाधिकारी विवेक नाकाडे , व सर्व गट विकास अधिकारी, सर्व गटशिक्षणाधिकारी, यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम दिनांक २६/०४/२०२४ रोजी पार पडला .

मार्च महिन्यातील जिल्हा स्तरावरील ‘पोस्ट ऑफ द मंथ’ विजेते अहेरी तालुक्यांतील उपक्रमशील शिक्षक श्री रवींद्र यमसलवार (ज़ि.प. प्रा.शाळा शिवणीपाट) आणि एटापल्ली तालुक्यातील श्रीकांत काटेलवार

(ज़ि.प. प्रा.शाळा वालवी)

यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.