Home गडचिरोली गडचिरोली येथील शिवसेनेच्या बैठकित येणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीसह विविध विषयावर चर्चा

गडचिरोली येथील शिवसेनेच्या बैठकित येणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीसह विविध विषयावर चर्चा

210

गडचिरोली येथील शिवसेनेच्या बैठकित येणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीसह विविध विषयावर चर्चा

शिवसेना जिल्हा पदाधिकाऱ्यांची स्थानिक विश्राम गृहात बैठक घेण्यात आली.

राजगोपाल सुल्वावार जिल्हा प्रमुख यांच्या उपस्थितीत

गडचिरोली:- आज दिनांक03/03/2021 रोज बुधवारला शिवसेना जिल्हा पदाधिकाऱ्यांची स्थानिक विश्राम गृहात विविध विषयांवर बैठक घेण्यात आली. या बैठकीत नुकताच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूक आणि येणाऱ्या नगरपंचायत निवडणूकांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या अनुषंगाने कसलाही चढाओढचा श्रेय नघेता जिल्ह्यात सर्वच पदाधिकारी पक्षकार्य करून पुढे पण एक जुटीने पक्षाच्या वाढीसाठी काम करणे गरजेचे आहे आणि ते करावे लागेल अशी चर्चा करण्यात आली. सध्या तरी जिल्ह्यात शिवसेनेचे प्रस्थ वाढते आहे आणि पक्षासाठी ते मोलाचे आहे हे समझुन जिल्हा पदाधिकारी एकत्र येऊन खेळीमेळीचे वातावरणात बैठक घेण्यात आली आहे. पुढे येत असलेल्या नगरपंचायतीच्या निवडणूक संदर्भात समोपचारानी चर्चा करण्यात आली. या चर्चा दरम्यान उपस्थित जिल्हा प्रमुख राजगोपाल सुल्वावार, माजी जिल्हा प्रमुख विजय श्रुंगारपवार, उप.जि.राजु कावळे, उप.जि.भारत जोशी समन्वय सुनील पोरड्डीवार,विधानसभा संघटक नंदुभाऊ कुमरे, बाळाभाऊ ठाकरे, महींद्रा सुल्वावार जिल्हा पदाधिकारी यांच्या उपस्थित बैठक पार पडली. जय महाराष्ट्र.

Don`t copy text!