Home गडचिरोली सेमाना देवस्थान मार्गावरिल पथदिवे एका दिवसाच्या आता सुरु करा अन्यथा गडचिरोली नगर...

सेमाना देवस्थान मार्गावरिल पथदिवे एका दिवसाच्या आता सुरु करा अन्यथा गडचिरोली नगर परिषद च्या मुख्याधिकारी यांच्या कक्षास कुलुप ठोकनार:- शिवसेना उपजिल्हा प्रमुख अरविंद भाऊ कात्रटवार यांचा इशारा

144

सेमाना देवस्थान मार्गावरिल पथदिवे एका दिवसाच्या आता सुरु करा अन्यथा गडचिरोली नगर परिषद च्या मुख्याधिकारी यांच्या कक्षास कुलुप ठोकनार:- शिवसेना उपजिल्हा प्रमुख अरविंद भाऊ कात्रटवार यांचा इशारा

 

गडचिरोली :- शहरातील चामोर्शी मार्गावरिल सेमाना देवस्थान पर्यंत चे काही पथदिवे गेल्या अनेक दिवसा पासून बंद पड़ले आहेत त्यामुळे या मार्गावर रात्री च्या सुमारास अंधार पसरला असतो या परिसरात वाघाची दहशत आहे सदर बाब लक्षात घेता या मार्गावरिल बंद असलेले पथदिवे एका दिवसाच्या आता सुरु करावे अन्यथा गडचिरोली नगर पालिकेच्या मुख्याधिकारी यांच्या कक्षास कुलुप ठोकन्यात येईल असा इशारा शिवसेना उपजिल्हा प्रमुख अरविंद भाऊ कात्रटवार यांनी दिला आहे. चामोर्शी मार्गावरिल सेमाना देवस्थान हे गडचिरोली शहर वासियांचे आराध्य दैवत आहे त्यामुळे या मार्गावर नगरिकांची ये-जा सुरु असते. शहरातील नागरिक पाहाटे व सायंकाळी या मार्गावर शरीर स्वास्थासाठि फिरण्यासाठी जातात मात्र पाहाटे व रात्री या मार्गावर अंधार असतो सदर परिसर झुंड़पी जंगलाचा असून या जंगलात वाघ व अन्य जंगली प्राण्याचा वावर आहे त्यामुळे पाहाटे व सायंकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे या बाबिचि गंभीरतेने दखल घेवून चामोर्शी मार्गावरिल सेमाना देवस्थान परिसरा पर्यंतचे समस्थ पथदिवे एका दिवसाच्या आत सुरु न केल्यास मुख्याधिकारी नगर परिषद गडचिरोली यांच्या कक्षाला कुलुप ठोकन्यात येईल असा इशारा शिवसेना उपजिल्हा प्रमुख अरविंद भाऊ कात्रटवार यानी दिला आहे.

Don`t copy text!