Home गडचिरोली गडचिरोलीत मुलींनी केला आईवर अंत्यसंस्कार

गडचिरोलीत मुलींनी केला आईवर अंत्यसंस्कार

284

गडचिरोलीत मुलींनी केला आईवर अंत्यसंस्कार

जागतिक महिला दिनी आईचा मृत्यू

गडचिरोली :-
गडचिरोली येथे जागतिक महिला दिनी श्रीमती रुक्मिणी श्रीराम कोहा ड (६०),मोहाडी,जिल्हा- भंडारा यांचे हृदय विकाराने निधन झाले. त्या लहान मुलीच्या बाळंतपण करिता गडचिरोली येथे आल्या होत्या.अचानक प्रकृती खराब झाल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचार दरम्यान त्यांचे निधन झाले. यांच्यावर त्यांच्या मुलींनी गडचिरोली येथे अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला कठानी नदीवर केले.

गोंडवाना विद्यापीठ,गडचिरोली येथील सौ.दिपाली रमेश निखारे यांच्या आई श्रीमती रुक्मिणी श्रीराम कोहाड,मोहाडी आहेत. गडचिरोली येथे त्यांची लहान बहीण सौ.पुनम प्रशांत निमजे यांच्या बाळंतपण करिता आले असता हृदय विकाराच्या झटक्याने निधन जागतिक महिला दिनी संध्याकाळी झाले.मृतकाचा एकुलत्या एक तरुण मुलाचे काही वर्षा पूर्वी अपघाती निधन झाले होते.

राष्ट्रीय हलबा जमात महामंडळ चे अध्यक्ष उदय धकाते यांनी पुढाकार घेत मृतकाचा एकुलत्या एक मुलाचे काही वर्षा पूर्वी अपघाती निधन झाले असल्याने आणि अंत्यसंस्कार करण्याचां अधिकार त्यांच्या ज्येष्ठ कन्या दिपाली निखारे आणि सौ.नलिनी निलेश डेकाटे,नागपूर यांना देण्याचा निर्णय घेतला आणि उपस्थित नातेवाईक महिलांनी सहमती दिली त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याचे सर्व सोपस्कार पूर्ण केले.

या वेळी सौ.सुचिता उदय धकाते, सौ.ममता अशोक धकाते,लता रूपराम निमजे,मंगला राजू बारापात्रे, यांनी सहकार्य केले.यावेळी शासकीय नियम पाळून अंत्यसंस्कार आणि विधी पार पाडले.

सदर या अंत्यसंस्कार ची विधी आणि श्रदांजली कार्यक्रम डॉ.सुशील कोहाड यांनी पार पाडले.या अंत्यसंस्कार ची सर्वत्र कौतुक होत आहे.

Don`t copy text!