टिसीओसी कालावाधी दरम्यान 03 जहाल माओवाद्यांनी केले गडचिरोली पोलीस व सिआरपीएफ समोर आत्मसमर्पण
श्व् शासनाने जाहिर केले होते एकुण 38 लाख रूपयांचे बक्षिस
श्व् एक सिवायपीसी/डीव्हीसीएम (Company Party Committee Member / Divisional Committee Member), एक डिव्हीसीएम (Divisional Committee Member) व एक एसीएम/पीपीसीएम (Area Committee Member / Platoon Party Committee Member) दर्जाच्या वरीष्ठ कॅडर पदावरील माओवाद्यांनी केले आत्मसमर्पण
श्व् पती-पत्नी जोडप्यासह एका महिला माओवाद्याने आत्मसमर्पण करुन स्वीकारला सन्मानाने जीवन जगण्याचा मार्ग
शासनाने सन 2005 पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण 699 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. आज दिनांक 14 फेब्राुवारी 2025 रोजी 01 सिवायपीसी/डी.व्हि.सी.एम., 01 डि.व्हि.सी.एम. व 01 ए.सी.एम./पी.पी.सी.एम. दर्जाचे वरिष्ठ माओवादी असे एकुण 03 जहाल माओवादी नामे 1) विक्रम ऊर्फ मंगलसिंग ऊर्फ संदिप सहागु तुलावी, (सिवायपीसी/डिव्हीसीएम/उप-कमांडर, कंपनी क्र. 10), वय 40 वर्षे रा. गुर्रेकसा, ता. धानोरा, जि. गडचिरोली, 2) नीलाबाई ऊर्फ अनुसया बंडु ऊईके, (डिव्हिसीएम, कुतुल दलम, माड डिव्हीजन), वय 55 वर्षे, रा. मेडपल्ली, ता. भामरागड, जि. गडचिरोली व 3) वसंती ऊर्फ सुरेखा ऊर्फ दुल्लो राजु हिडामी, (पि.पी.सी.एम./सी-सेक्शन कमांडर, कंपनी क्र. 10), वय 36 वर्षे, रा. गुर्रेकसा, ता. धानोरा, जि. गडचिरोली यांनी गडचिरोली पोलीस व सिआरपीएफ समोर आत्मसमर्पण केले.
आत्मसमर्पित जहाल माओवादी सदस्यांबाबत माहिती
1. विक्रम ऊर्फ मंगलसिंग ऊर्फ संदिप सहागु तुलावी
दलममधील कार्यकाळ
श्व् सन 2004 मध्ये टिपागड दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन सन 2005 पर्यंत काम केले.
श्व् सन 2006 मध्ये एसीएम पदावर पदोन्नती होऊन टिपागड दलममध्ये काम केले.
श्व् सन 2006 मध्ये धानोरा दलममध्ये कमांडर पदावर पदोन्नती होऊन सन 2007 पर्यंत काम केले.
श्व् सन 2007 मध्ये माड मधील कुतुल एरीयामध्ये वैद्यकिय कामकाजाचे प्रशिक्षण घेतले.
श्व् सन 2008 मध्ये कंपनी क्र. 04 मध्ये एसीएम/पीपीसीएम पदावर बदली होऊन सन 2010 पर्यंत डॉक्टर म्हणून काम केले.
श्व् सन 2010 मध्ये कंपनी क्र. 10 मध्ये उप-कमांडर (सीवायपीसी) पदावर पदोन्नती होऊन सन 2012 पर्यंत काम केले.
श्व् सन 2012 मध्ये डीके झोन डॉक्टर टिममध्ये कमांडर पदावर काम केले.
श्व् सन 2012 ते 2015 पर्यंत, बटालीयन क्र. 02 मध्ये सीवायपीसी पदावर काम केले.
श्व् सन 2015 ते 2017 पर्यंत, डीके झोन डॉक्टर टिममध्ये सीवायपीसी/डिव्हिसीएम पदावर काम केले.
श्व् सन 2017 ते 2022 पर्यंत, कंपनी क्र. 01 मध्ये सीवायपीसी/कमांडर तसेच सचिव पदावर काम केले.
श्व् सन 2022 पासून आतापर्यंत, कंपनी क्र. 10 मध्ये सीवायपीसी/डिव्हिसीएम/उप-कमांडर पदावर काम केले.
2. नीलाबाई ऊर्फ अनुसया बंडु ऊईके
दलममधील कार्यकाळ
श्व् माहे डिसेंबर 1988 मध्ये भामरागड दलममध्ये सदस्य पदावर भरती होवून सन 1991 पर्यंत काम केले.
श्व् सन 1991 मध्ये कोहलीबेडा दलम (उत्तर बस्तर डिव्हीजन (छ.ग.)) मध्ये बदली होऊन सन 1996 पर्यंत सदस्य पदावर काम केले.
श्व् सन 1996 साली कोहलीबेडा दलममध्ये एसीएम (एरीया कमिटी मेंबर) पदावर पदोन्नती होऊन सन 2002 पर्यंत काम केले.
श्व् माहे मे 2002 मध्ये माड डिव्हीजनमधील कोहकामेट्टा दलममध्ये बदली होऊन सन 2003 पर्यंत एसीएम पदावर काम केले.
श्व् सन 2003 मध्ये कमांडर पदावर पदोन्नती होऊन कोहकामेट्टा महिला दलम या नवीन दलममध्ये सन 2005 पर्यंत काम केले.
श्व् सन 2005 पासून 2011 पर्यंत, कुतूल-कोहकामेट्टा एरीया कमिटीमध्ये नवीन सदस्यांना माओवादी चळवळीची माहिती देण्याचे व नक्षल साहित्यांच्या भाषांतराचे काम केले.
श्व् सन 2012 मध्ये कोहकामेट्टा दलममध्ये डिव्हिसीएम पदावर पदोन्नती होऊन सन 2015 पर्यंत काम केले.
श्व् सन 2015 मध्ये, मोपोस (मोबाईल पॉलीटीकल स्कुल) मध्ये बदली होऊन सन 2018 पर्यंत काम केले.
श्व् सन 2018 मध्ये, ऊसेवाडा टेलर टिममध्ये बदली होऊन सन 2025 पर्यंत काम केले.
श्व् माहे जानेवारी 2025 पासून कुतूल एरीया कमिटीतील टेलर टिममध्ये बदली होऊन डिव्हिसीएम पदावर आजपावेतो काम केले.
3. वसंती ऊर्फ सुरेखा ऊर्फ दुल्लो राजु हिडामी
दलममधील कार्यकाळ
श्व् सन 2008 मध्ये मौजा गुर्रेकसा गावातील केएएमएस (क्रांतीकारी आदिवासी महिला संघटन) मध्ये सदस्य पदावर भरती होऊन सन 2009 पर्यंत काम केले.
श्व् माहे मे 2009 टिपागड दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन माहे ऑक्टोंबर 2009 पर्यंत काम केले.
श्व् माहे ऑक्टोंबर 2009 मध्ये कंपनी क्र. 04 मध्ये बदली होऊन सन 2010 पर्यंत काम केले.
श्व् माहे जुलै 2010 मध्ये कंपनी क्र. 10 मध्ये बदली होऊन माहे जानेवारी 2012 पर्यंत काम केले.
श्व् माहे जानेवारी 2012 मध्ये डीके झोन डॉक्टर टिममध्ये बदली होऊन काम केले.
श्व् माहे मार्च 2012 मध्ये माड डिव्हीजन मधील बटालियन क्र. 02 मध्ये बदली होऊन सन 2015 पर्यंत काम केले.
श्व् सन 2015 मध्ये डिके झोन डॉक्टर टिममध्ये बदली होऊन सन 2017 पर्यंत काम केले.
श्व् सन 2017 मध्ये डिके झोन टेलर टिममध्ये बदली होऊन सन 2023 पर्यंत सदस्य पदावर काम केले.
श्व् माहे डिसेंबर 2023 मध्ये कंपनी क्र. 10 मध्ये बदली होऊन माहे ऑक्टोंबर 2024 पर्यंत काम केले.
श्व् माहे ऑक्टोंबर 2024 मध्ये कंपनी क्र. 10 पीपीसीएम (प्लाटुन पार्टी कमिटी मेंबर) पदावर पदोन्नती होऊन सी-सेक्शन उपकमांडर म्हणून आजपावेतो काम केले.
आत्मसमर्पीत होण्याची कारणे
गडचिरोली पोलीसांच्या सततच्या गस्तीमुळे जंगलात फिरणे कठिण झाले होते.
नक्षल दलममध्ये अहोरात्र भटकंतीचे जीवन असल्यामुळे स्वत:च्या आरोग्याविषयी समस्या उद्भवल्यास त्याकडे काळजीपुर्वक लक्ष दिल्या जात नाही.
चकमकीदरम्यान पुरुष माओवादी पळून जाण्यात यशस्वी होतात, मात्र महिला यात ठार मारल्या जातात.
खबरी असल्याच्या फक्त संशयावरून आमच्याच बांधवांना ठार मारायला सांगतात.
माओवादी दलममधील जेष्ठ माओवाद्यांकडुन स्त्रीयांना भेदभावजनक वागणूक दिली जाते.
दलममधील वरिष्ठ कॅडरचे माओवादी सांगतात की, चळवळीकरीता/जनतेकरीता पैसे गोळा करावे. प्रत्यक्षात गोळा केलेला पैसा ते स्वत:साठीच वापरतात. जनतेच्या विकासासाठी हा पैसा कधीच वापरल्या जात नाही.
वरिष्ठ माओवादी नेते फक्त स्वत:च्या फायद्यासाठी गरीब आदिवासी युवक-युवतींचा वापर करून घेतात.
शासनाने जाहिर केलेले बक्षीस
महाराष्ट्र शासनाने विक्रम ऊर्फ मंगलसिंग ऊर्फ संदिप सहागु तुलावी याच्यावर 16 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.
महाराष्ट्र शासनाने नीलाबाई ऊर्फ अनुसया बंडु ऊईके हिच्यावर 16 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.
महाराष्ट्र शासनाने वसंती ऊर्फ सुरेखा ऊर्फ दुल्लो राजु हिडामी हिच्यावर 06 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.
आत्मसमर्पणानंतर शासनाकडून मिळणारे बक्षीस
आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन विक्रम ऊर्फ मंगलसिंग ऊर्फ संदिप सहागु तुलावी याला एकुण 8.5 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.
आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन नीलाबाई ऊर्फ अनुसया बंडु ऊईके हिला एकुण 8.5 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.
आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन वसंती ऊर्फ सुरेखा ऊर्फ दुल्लो राजु हिडामी हिला एकुण 05 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.
विक्रम ऊर्फ मंगलसिंग ऊर्फ संदिप सहागु तुलावी व त्याची पत्नी वसंती ऊर्फ सुरेखा ऊर्फ दुल्लो राजु हिडामी यांना एकत्रित अतिरीक्त 1.5 लाख रुपयांसह एकुण 15 लाख रुपये पुनर्वसनाकरीता बक्षीस म्हणून मिळणार आहे.
गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन 2022 ते आतापर्यंत एकुण 53 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. तसेच सन 2025 साली आतापर्यंत एकुण 20 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले. सदर माओवाद्यांचे आत्मसमर्पण घडवून मुख्यप्रवाहात आणण्याबाबतची कारवाई श्री. संदिप पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर, श्री. अंकित गोयल, पोलीस उप-महानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र, श्री. अजय कुमार शर्मा, पोलीस उप-महानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ, श्री. नीलोत्पल, पोलीस अधीक्षक गडचिरोली व श्री. सत्य प्रकाश, कमांण्डट 191 बटा. सिआरपीएफ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. यावेळी पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांनी आवाहन केले की, विकासकामांना आडकाठी निर्माण करणाया माओवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असुन, जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा.