Home गडचिरोली नवेगाव येथे रेतीची अवैध वाहतूक करणारे चार मिनी ट्रक जप्त

नवेगाव येथे रेतीची अवैध वाहतूक करणारे चार मिनी ट्रक जप्त

230

नवेगाव येथे रेतीची अवैध वाहतूक करणारे चार मिनी ट्रक जप्त

गडचिरोली: चंद्रपूर रोडवरील नवेगाव येथे सहाय्यक जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या पथकाने लांझेंडा घाटावरून वाळूची अवैध वाहतूक करणारे 4 मिनी ट्रक जप्त केले.ही कारवाई शनिवारी करण्यात आली.या कारवाईमध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्यासह नायब तहसिलदार हेमंत मोहरे, तलाठी अजय तुनकालवार,भूषण जवनजाळकर,गणेश खंदारे,कोतवाल किशोर मडावी यांचा सहभाग होता.
लांझेंडा रेटिघाटावरून नवेगावच्या दिशेने 4 मिनी ट्रक द्वारे वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती सहाय्यक जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या पथकाला मिळाली. त्यानी वाळूची 4 मिनी ट्रक थांबवून वाहतूक परवाना तपासणी केली असता त्यात अवैध रेती आढळून आल्याने 4 मिनी ट्रक सह 9 ब्रास रेतीचा पंचनामा करून उपविभागीय कार्यालय गडचिरोली येथे ठेवण्यात आले. या कारवाईमुळे अवैध वाहतूक करणाऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.

Don`t copy text!