अतिदुर्गम झिमेला वासियांना ७४ वर्षानंतर मिळले पूल
जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते भूमिपूजन
अहेरी : जिल्हा परिषद गडचिरोली, पंचायत समिती अहेरी व ग्राम पंचायत तिमरम अंतर्गत येणाऱ्या झिमेला पोचमार्गावरील मोठया नाल्यावर नागरिकांना पुलाची प्रतीक्षा होती. आता ती संपणार असून काल १३ मार्च रोजी सदर पूल बांधकामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
झिमेला हा गाव सिरोंचा ते आलापली या राष्ट्रीय महामार्गावरून ३ किमी अंतरावर असून या गावात पोहचण्यासाठी लहान मोठे दोन-तीन नाले आहे. पावसाळ्यात या गावाचा तालुक्याशी संपर्क तुटत असतो. येथील शेतकरी, विद्यार्थी, आरोग्य कर्मचारी, शालेय कर्मचारी यांना नाहक अनेक प्रकारचे त्रास होत होते. मागील पावसाळ्यात अतिवृष्टी मुळे या नाल्यावरील छोटासा रपटा वाहून गेला होता. सदर बाब जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या लक्षात येताच त्यावेळी जि.प. अध्यक्षांनी नाल्यावर येऊन पाहणी करून तात्पुरता रस्ता दुरुस्त केला व झिमेला गाव वासीयांना या ठिकाणी लवकरच मोठा पुल मंजूर करून होणारा त्रास कमी करणार असे आश्वासन दिले.
जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत १ कोटी रुपयांची झिमेला नाल्यावर पुल मंजूर केले आहेत त्या पुल बांधकामाचे भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ७४ वर्षांपासून या पुलाची प्रतीक्षा होती ते स्वप्न आज पूर्ण होताना दिसत आहे,. झिमेला वासीयांचे रस्त्याच्या समस्या मिटणार असल्याने म्हणून समस्त गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केले.
सदर पुल बांधकाम भूमिपूजन करताना जि.प. सदस्या सुनीता कुसनाके, जि.प.सदस्य अजय नैताम, प.स.सदस्य योगीताताई मोहूर्ले, ग्रा.प.तिमरमचे उपसरपंच प्रफुलभाऊ नागुलवार, ग्रा.प. सदस्य दिवाकर गावडे, ग्रा.प. सदस्य श्रीकांत पेंदाम, गंगाराम आत्राम, नागेश शिरलावार, धर्मराज पोरतेट, प्रशांत गोडशेलवार, श्रीनिवास राऊत, हरीश गावडे, संदिप दुर्गे, माजी उपसरपंच जगनाथ मडावी, माजी सरपंच महेश मडावी, शशिकला पेंदाम, रमेश कोरेत, महेश सिडाम तसेच झिमेला येथील महिला पुरुष उपस्थित होते.







