Home Breaking News मनसे जिल्हाध्यक्ष यांना ट्रक ने ठोकले. चक्का जाम

मनसे जिल्हाध्यक्ष यांना ट्रक ने ठोकले. चक्का जाम

139

मनसे जिल्हाध्यक्ष यांना ट्रक ने ठोकले. चक्का जाम

गडचिरोली, प्रतिनिधी :-

गडचिरोली शहरातील अपघाताची मालिका सुरूच असून आज मनसे जिल्हाध्यक्ष राजेंद्र साळवे यांना ट्रक ने धडक दिली. यात ते जख्मी झाले. या अपघातामुळे संतप्त नागरिकांनी कारगील चौकातील मच्छी मार्केट जवळ चंद्रपूर मार्गे येणारे वाहनाना रोखून चक्काजाम केले.

 

चंद्रपूर मार्गाने सिमेंट चा ट्रक क्रमांक एम. एच. ३४ बि. ९२८९ गडचिरोली शहरात येत होता. या ट्रस्ट चा ड्रायव्हर हा दारू पिऊन ट्रस्ट चालवत होता. या ट्रक ने मनसेजिल्हा अध्यक्ष राजेंद्र साळवे यांना धडक दिली. या मुळे त्यांचे हाताला गंभीर दुखापत झाली. त्यांचे हाताला फॅक्चर झाले आहे.

या दरम्यान सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर भडांगे यांनी नेहमीच होणाऱ्या अपघात कडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे या ठिकाणी चक्का जाम केले.

या मार्गावरील वाहतूक जवळपास पाऊण तास बंद झाली होती. घटना स्थळी पोलीस उशिरा पोहचले.

या मुळे येथील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी बळजबरीने चंद्रशेखर भडांगे, जख्मी असलेले मनसे अध्यक्ष राजेंद्र साळवे त्यांचे जेष्ठ बंधू सेवानिवृत्त शिक्षक यांना बळजबरीने उचलले. या वेळी सेवानिवृत्त शिक्षक विजय साळवे यांनी पोलिसांनी ढकल्याने त्यांच्या पायाला लागले.

ट्रक ड्रायवर हा नशेत असल्याने त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन ट्रस्ट जप्त केले आहे. वृत्त लिही पर्यंत गुन्हा दाखल झाला नाही.

Don`t copy text!