व्याहाड ( बुज. ) येथील श्री किसान सहकारी राईस मिल वर सुनीलभाऊ बोमनवार गटाचा झेंडा , सर्वच जागा जिंकल्या
उपरी प्रतिनिधी ,
सावली तालुक्यातील व्याहाड ( बुज. ) येथे १० जुन रोजी पार पडलेल्या श्री किसान सहकारी राईस मिलच्या निवडणुकीत सुनील बोमनवार यांचे नेतृत्वाखाली लढलेल्या शेतकरी राईसमिल विकास पॅनल ने ११ पैकी ११ जागा जिंकून आपली सत्ता स्थापन केली आहे .
सदर संस्थेच्या ११ संचालक पदाच्या निवडणुकीसाठी व्याहाड बुज. येथिल काँग्रेस चे युवा नेते ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजयभाऊ यांचे समर्थक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा श्री किसान सहकारी तांदूळ गिरणी मर्यादित व्याहाड बुज. चे माजी अध्यक्ष सुनील बोमनवार यांनी शेतकरी राईसमिल विकास पॅनल तयार करून आपले ११ जागेसाठी ११ उमेदवार उभे केले . विरोधी गटातून प्रमोद इंगुलवार यांनी दोन जागेवर नामांकन दाखल केले . ह्या उमेदवाराणी उमेदवारी मागे घेतली असती तर या संस्थेची निवडणूक अविरोध होऊ शकली असती . परंतु तसे न झाल्याने १० जुन २०२५ रोजी निवडणूक घेण्यात आली . यात सुनिल बोमनवार यांचे नेतृत्वाखाली लढविण्यात आलेल्या शेतकरी राईसमिल विकास पॅनल चे ११ ही उमेदवार विजयी झाले . विजय झालेल्या उमेदवारामध्ये सुनिल बोमनवार , मारोती कांबळे , प्रभाकर लेनगुरे , राजु मशाखेत्री , ज्ञानेश्वर सातपैसे , बाबुराव वासेकर , विलास मेश्राम , सुचिता राजु सुरमवार , प्रेमीला राजेंद्र सातपुते , शितल वामन मोटघरे , पांडुरंग चलाख यांचा समावेश आहे . विजय उमेदवारांचे चिमूर गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान , ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजयभाऊ वडेट्टीवार , जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती दिनेशपाटील चिटनूरवार , कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांतपाटील चितनूरवार , निखिल सुरमवार , रोहित बोमावार यांनी नवनिर्वाचित संचालक मंडळाचे अभिनंदन केले .
ज्ञानेश्वर सिडाम उपरी