Home गडचिरोली कारगील चौकात पोलीस वाहनाला अपघात उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनील गिल्डा बचावले

कारगील चौकात पोलीस वाहनाला अपघात उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनील गिल्डा बचावले

365

कारगील चौकात पोलीस वाहनाला अपघात
उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनील गिल्डा बचावले

कोविड मृतकाचे वाहन थांबले.

गडचिरोली,प्रतिनिधी :-

शहरातील कारगील चौकात दुपारी तीन वाजता दरम्यान कॉम्प्लेस कडून भरधाव वेगाने येणारी पोलीस वाहन वर नियंत्रण सुटल्याने दुभाजकावर गेल्याने वाहन पलटले.सुदैवाने यात प्राणहानी झाली नाही.या वाहनात उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनील गिल्डा होते.दोन पोलीस कर्मचार्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

कॉम्प्लेस कडून येणारे ट्रक क्रमांक टी.एस.08 यु इ १५६९ ला ओवर टेक करून पोलीस वाहन कक्रमांक एम.एच.३ सी.४३६ हि जात असताना वाहन चालकाचा ताबा सुटल्याने पोलीस वाहन हे दुभाजक वर पलटली. याच सोमवारला गडचिरोली उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून प्रनील गिल्डा हे रुजू झाले आहेत.

मुख्य म्हणजे ट्रक चालकाची कोणतीही चूक नसतांना त्याला नागरिकांनी मारहाण केली. पोलिसांना वाहनातून काढण्याकरिता उदय धकाते,महेंद्र वाघमारे,बादल आरेकर आणि नंदू कुमरे यांनी मदत केली.

कोविड मृतकाचे वाहन थांबले.

सदर अपघात झाला त्यावेळी सामान्य रुग्णालय गडचिरोली येथून एक कोविड ने मृत्यू झालेले व्यक्तीला चे शववाहिका मधून नेत होते. जवळपास १५ मिनिट इथे या शववाहकीला येथे वाहनाचे रीघ लागल्याने तसेच नागरिकांची गर्दी झाल्याने थांबावे लागले होते. शव वाहिका मध्ये कोविड मृतकाचे शव असल्याचे वाहनातील आरोग्य कर्मचारी यांनी सामाजिक कार्यकर्ते उदय धकाते यांना सांगितले.उदय धकाते यांनी आणि त्यांच्या मित्रमंडळीनि शववाहिका ला जाण्यासाठी मार्ग सुरळीत करून दिले.

Don`t copy text!