कै. राजे विश्वेश्वरराव महाराज यांची पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न

177

कै. राजे विश्वेश्वरराव महाराज यांची पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न

आष्टी: – आज दिनांक 27 मार्च रोज शनिवारला राजे धर्मराव हायस्कूल अडपल्ली माल येथे नाग विदर्भ आंदोलन समितीचे संस्थापक अध्यक्ष कै. राजे विश्वेश्वरराव महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राजे धर्मराव हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री एन एस बोरकुटे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून श्री के पी मंडल ,श्री आर आर सरकार, श्री एम एन सरकार हे होते.
” मी जगेन तर वेगळ्या विदर्भासाठी, मरेन तर वेगळ्या विदर्भासाठी”असे ठणकावून सांगणारे कै. राजे विश्वेश्वरराव महाराज यांनी नाग विदर्भ आंदोलन समितीच्या माध्यमातून वेगळ्या विदर्भाची मागणी रेटून धरली. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक श्री एन एस बोरकुटे यांनी सांगितले की ते एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी आपले पिताश्री कै. श्रीमंत राजे धर्मराव महाराज यांच्या नावाने सन 1958 मध्ये राजे धर्मराव शिक्षण मंडळाची स्थापना केली व अनेक शाळा व महाविद्यालये उघडली व आदिवासी क्षेत्रात शिक्षणाची संधी उपलब्ध करुन दिली म्हणून खऱ्या अर्थाने त्यांना शिक्षण महर्षी म्हणून संबोधले जाते. त्यांनी तिन वेळा आमदार पद भूषविले व एक वेळा खासदार म्हणून संसदेत कार्य केले.1995 मध्ये त्यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात चंद्रपूर ते नागपूर असा पायदळ प्रवास केला व वेगळ्या विदर्भाची मागणी केली. श्री के पी मंडल यांनी कै. राजे विश्वेश्वरराव महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला व कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एम बी भोयर यांनी केले व आभार श्री एस टी. ब्राह्मणकार यांनी केले. कार्यक्रम प्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.