आत्तापर्यंत जिल्हयात एकूण बाधितांपैकी 10 हजार कोरोनामुक्त झाले

108

आत्तापर्यंत जिल्हयात एकूण बाधितांपैकी 10 हजार कोरोनामुक्त झाले

आज नव्याने 41 कोरोनामुक्त तर एका मृत्यूसह इतर 28 नवीन कोरोना बाधित

गडचिरोली,(जिमाका)दि.29 :-  जिल्हयात एकूण कोरोना बाधितांपैकी कोरोनामूक्त रूग्णांचा आकडा 10 हजार पूर्ण झाला. आज जिल्हयात 41 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. तसेच 28 नवीन कोरोना बाधित आढळून आले. आत्तापर्यंत एकूण बाधित 10518 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 10,00,1 वर पोहचली. तसेच सद्या 407 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 110 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. नवीन एका मृत्यूमध्ये वडसा येथील 85 वर्षीय वृद्ध व्यक्तीचा समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.08 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 3.87 टक्के तर मृत्यू दर 1.05 टक्के झाला.

नवीन 28 बाधितांमध्ये गडचिरोलीतील 17, अहेरी तालुक्यातील 3, आरमोरी तालुक्यातील 4, चामोर्शी तालुक्यातील 1, एटापल्ली तालुक्यातील 02, कुरखेडा तालुक्यातील 01 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 41 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 24,अहेरी 4, आरमोरी 2, भामरागड 04, धानोरा 1, एटापल्ली 01, मुलचेरा 01, कुरखेडा 01, तर वडसा मधील 3 जणांचा समावेश आहे.

नवीन 28 बाधितांमध्ये अहेरी तारलुक्यातील आलापल्ली 2 तर शहरातील 1 जण आहे. आरमोरी मधील 4 सर्व स्थानिक आहेत. चामोर्शी मधील एक मार्कंडा येथील आहे. एटापल्ली दोघेही स्थानिक आहेत. गडचिरोली मधील जीएनएम होस्टेल जवळ 1, रोज टावर अपार्टमेंट जवळ 1, गोकूळ नगर 1, चामोर्शी रोड 1, इतर जिल्हयातील 1, प्रियांका हायस्कूल कनेरी जवळ 5, कारगील चौक 1, महिला महाविद्यालय जवळ 1, आनंद नगर 3, साईनगर 1, पोस्ट ऑफिस जवळ 1 जणांचा समावेश आहे. कुरखेडा मधील एकजण गर्नोली येथील आहे.
**