Home गडचिरोली एडवोकेट चंद्रकांत निमजे यांचा डोंगेघाट येथे बुडून मृत्यू

एडवोकेट चंद्रकांत निमजे यांचा डोंगेघाट येथे बुडून मृत्यू

232

एडवोकेट चंद्रकांत निमजे यांचा डोंगेघाट येथे बुडून मृत्यू

ब्रह्मपुरी:- 

ब्रह्मपुरी येथील नामांकित वकील एडवोकेट चंद्रकांत निमजे वय 43 हे आज सकाळी घरून निघाले फिरत फिरत ब्रह्मपुरी पासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगे घाट या ठिकाणात आले व आंघोळीची इच्छा झाल्यामुळे कपडे काढून पाण्यामध्ये उतरले परंतु बरोबर पोहता येत नसल्यामुळे पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला.
सायंकाळच्या सुमारास नियमित पोहायला येणारे लोक सायंकाळी पाच वाजता डोंगे घाटावर आले असता मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला त्यावरून या घटनेची माहिती झाली पोलिस स्टेशनला माहिती दिली असता पोलीस लोक या ठिकाणी येऊन पंचनामा केला
पुढील तपास ब्रह्मपुरी पोलिस करीत आहे घटनास्थळी ब्रह्मपुरी चे ठाणेदार मल्लिकार्जुन इंगळे पो.ह. अरूण पिसे व इतर कर्मचारी घटनास्थळी घटनास्थळी उपस्थित झाले

Don`t copy text!