छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती छत्रपती शिवाजी महाराज चौक एटापल्ली येथे उत्साहात साजरी
तसेच शिवजयंतीचे औचित्य साधून शिवसेना जिल्हाप्रमुख राजगोपालजी सुल्वावार यांची जिल्हा नियोजन समिती वर सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल शाल व श्रीफळ देवून सत्कार
एटापल्ली:- येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक एटापल्ली येथे आज दिनांक ३१ मार्च २०२१ रोजी (तिथीनुसार) छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती निमित्य मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
त्यांनतर शिवसेना जिल्हाप्रमुख मा.श्री.राजगोपालजी सुल्वावार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ध्वजारोहण करण्यात आले.
व तसेच शिवजयंतीचे औचित्य साधून गडचिरोली जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख मा.श्री.राजगोपालजी सुल्वावार यांची जिल्हा नियोजन समिती व सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.
यावेळी किसनजी मट्टामी तालुका प्रमुख ग्रामीण,मनीष दुर्गे तालुका प्रमुख शहर,राहुल आदे शहर प्रमुख,सलीम शेख,इशांक दहागावकर,सुरेश करमे,दीपक दत्ता,प्रसाद दासरवार,तनुज बल्लेवार, सतीश मुप्पलवार,सागर कुळयेटी,विशाल गुरूनूले,सुजल दुर्गे,पवन चित्तलवार,हर्षद शेख,विकास बडा,गौतम बांबोले,विलास पेरमेलवार,नेहाल कुंभारे,निखिल खोब्रागडे,अक्षय पुंगाटी, चेतन गड्डमवार,राघव सुल्वावार,राकेश तेलकुंटलवार व शिवसैनिक उपस्थित होते.