अशोक पाटील येलमुले यांचे दुःखद निधन.

612

अशोक पाटील येलमुले यांचे दुःखद निधन.

आष्टी-
अनखोडा येथील प्रतिष्ठित नागरिक व अनखोडा ग्रामपंचायतीचे 15 वर्ष सरपंच पद भूषविलेले अशोक पाटील येलमुले यांचे दीर्घ आजाराने शनिवारी 11 वाजताच्या दरम्यान दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले.
चंद्रपूर जिल्हापरिषदेचे माजी उपाध्यक्ष स्व.भगीरथ पाटील येलमुले यांचे पुतणे असून ते मनमिळाऊ स्वभावाचे धनी म्हणून आष्टी परिसरात सुपरिचित होते.त्यांच्यावर आज अनखोडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी शोकसभा घेण्यात आली.याप्रसंगी डॉ, आंबोरकर, टी चंद्रशेखर, श्री देठेकर,राकेश बेलसरे, संजय पंदिलवार, वाकुडकर सर यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या व त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला.यावेळी त्यांचे आप्तेष्ट,मित्रमंडळी व अनखोडा येथील नागरिक उपस्थित होते.
त्यांच्या पाठीमागे पत्नी मुलगा, मुलगी, सून,भावंडे असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.