Home क्राईम जगत माजी उपसरपंच रामा तलांडी यांची नक्षलवाद्यांकडून गोळी झाडून हत्या

माजी उपसरपंच रामा तलांडी यांची नक्षलवाद्यांकडून गोळी झाडून हत्या

1272

माजी उपसरपंच रामा तलांडी यांची नक्षलवाद्यांकडून गोळी झाडून हत्या

एटापल्ली तालुक्यातील बुर्गी येथील घटना

एटापल्ली,
तालुक्यातील बुर्गी येथील माजी उपसरपंच तथा आदिवासी विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते रामा तलांडी वय ३७ वर्ष यांची शनिवारी रात्री १०.३० च्या सुमारास नक्षल्यांनी बंदुकीतून गोळी झाडून हत्या केली.
रामा तलांडी बुर्गी ग्रामपंचायत मध्ये १० वर्ष उपसरपंच होते.

बुर्गी येथे एका लग्न समारंभात डीजे लावत असतांना साध्या वेशात आलेल्या नक्षल्यांनी रामा तलांडी यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या व नक्षलवादी जंगलात पसार झाले.
यात रामा तलांडी यांच्या जागेवरच मृत्यू झाला.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही वर्षांपूर्वी बुर्गी येथे पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केले होते.त्यावेळी रामा तलांडी यांनी फडणवीस यांना रस्ते व मोबाईल टॉवरची मागणी केली होती.
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.

Don`t copy text!