शेतकऱ्यांना ताबडतोब मदत द्या        बी आर एस पी ची मागणी

123

शेतकऱ्यांना ताबडतोब मदत द्या

बी आर एस पी ची मागणी

****************************

नागपूर — महाराष्ट्र सर्वत्र परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे.

अतिवृष्टीमुळे शेतातील उभे पीक पाण्याखाली गेले आहे.त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. आधीच डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे.त्यात शेतातील उभे पीक पाण्याखाली गेल्यामुळे तो अक्षरशः रडकुंडीला आला आहे.आधीच शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची संख्या वाढत आहे.आता या नैसर्गिक आपत्तीने शेतकरी विवंचनेत आहे.

अशावेळी सरकारने पंचनाम्यात वेळ घालवून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसू नये.म्हणून बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या विदर्भातील जिल्हा, विधानसभा पदाधिकाऱ्यांच्य शिष्टमंडळाने सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, कृषीमंत्री यांना आज निवेदने देऊन शेतकऱ्यांना ताबडतोब हेक्टरी 50 हजार रुपये ताबडतोब मदत जाहीर करून त्यांना रक्कम मिळेल अशी व्यवस्था करावी अशी मागणी करण्यात आली.

गडचिरोली जिल्हाधिकारी यांच्या मार्फत गडचिरोली जिल्हा शाखेचे जिल्हा अध्यक्ष मिलिंद बांबोळे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने निवेदन दिले.शिष्टमंडळात अरविंद वाळके जिल्हा मासाचिव, महिला जिल्हा अद्यक्ष्या विद्याताई कांबळे, उर्मिला रायपुरे रेखाताई कुंभारे , आवडती वाळके, विलास कुंभारे, आकाश बांबोळे, तुषार रामटेके, विलास खोब्रागडे चंद्रकांत रायपूरे, मिथुन गेडाम, दंबजी रायपूरे सुधाकर गेडाम चंदुलाल गेडाम चंद्रप्रकाश गेडाम व पक्ष्याचे पदाधिकारी यांचा समावेश होता.