पोस्टे कटेझरी हद्दीतील माओवादी स्मारक गडचिरोली पोलीसांनी केले नष्ट

137

 

पोस्टे कटेझरी हद्दीतील माओवादी स्मारक गडचिरोली पोलीसांनी केले नष्ट

 

* दोन ते तीन वर्ष जुने मौजा कटेझरी व मर्मा जंगल परिसरात माओवाद्यांनी उभारलेलेे दोन स्मारक सुरक्षा दलातील जवानांनी केले नष्ट

* स्मारकाच्या ठिकाणी वृक्षारोपण करीत पोलीस दलाने दिला शांतता व सुरक्षेचा संदेश

 

दुर्गम-अतिदुगम भाग असलेला गडचिरोली जिल्हा हा माओवाददृष्टया संवेदनशील आहे. येथील जनतेच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी आणि आपले अस्तित्व दाखविण्यासाठी माओवाद्यांकडून अतिदुर्गम भागांमध्ये माओवादी स्मारकांची निर्मिती केली जात होती. मात्र गेल्या काळात गडचिरोली पोलीस दलाकडून राबविल्या जाणा­या प्रभावी माओवादविरोधी अभियानांमुळे जिल्ह्रातील सामान्य नागरीकांच्या मनात माओवाद्यांची असलेली भिती कमी होताना दिसून येत आहे. याच प्रकारे माओवाद्यांच्या भूतकाळातील हिंसाचाराचे प्रतीक असलेले पोस्टे कटेझरी हद्दीतील दोन ते तीन वर्ष जुने मौजा कटेझरी व मर्मा जंगल परिसरात माओवाद्यांनी उभारलेले स्मारक गडचिरोली पोलीस दलातील जवानांनी नष्ट केले आहे.

 

सविस्तर वृत असे आहे की. काल दिनांक 30/09/2025 रोजी पोस्टे कटेझरी येथील पोलीस पथक आणि एसआरपीएफचे जवान मौजा कटेझरी व मर्मा जंगल परिसरात अभियान राबवित असताना, जंगल परिसर शोध अभियान राबविते वेळी सदर जंगल परिसरात दोन ते तीन वर्ष जुने असलेले माओवाद्यांनी उभारलेले दोन स्मारक दिसून आले. सदर दोन्ही माओवादी स्मारक हे मागील काही वर्षांपासून अस्तित्वात होते. यावरून मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर माओवादी स्मारकांची बिडीडीएस पथकाने तपासणी केल्यानंतर दोन्ही स्मारके पाडून टाकण्यात आले असून ते उध्वस्त करण्यात आले आहेत. तसेच स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने सदर दोन्ही स्मारक उद्धस्त करण्यात आले असून, त्याठिकाणी शांततेचे प्रतीक म्हणून वृक्षारोपण करण्यात आले आहे.

 

यावेळी पोलीस पथकाकडून उपस्थित नागरीकांना माओवाद्यांच्या खोट¬ा भुलथापांना बळी न पडता पोलीसांना सहकार्य करून गावाचा विकास करण्याचे आवाहन करण्यात आले तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यात आली आहे. यावेळी पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल यांनी सांगितले की, ‘माओवाद्यांच्या दहशतीपासून नागरीकांना मुक्त करण्यासाठी गडचिरोली पोलीस दल प्रयत्नशील आहे.’ यासोबतच ‘माओवाद्यांच्या अशा स्मारकाला समाजात कुठेच स्थान नसून कोणीही अशा बेकायदेशीर बांधकामांमध्ये सहभागी होऊ नये’ असे आवाहन केले आहे.

 

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) श्री. सत्य साई कार्तिक, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी. तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक धानोरा श्री. अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे कटेझरीचे प्रभारी अधिकारी पोउपनि. अजय भोसले, एसआरपीएफ गट 11 चे पोउपनि. कुणाल भारती तसेच पोस्टे कटेझरीचे पोलीस अंमलदार व एसआरपीएफचे जवान यांनी पार पाडली.