आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनानिमित्त वडसा पंचायत समितीत माहिती अधिकार कायद्यावरील भव्य प्रबोधन कार्यशाळा
गडचिरोली दि. ०१ ऑक्टोबर २०२५, बुधवार
आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनाचे औचित्य साधून पंचायत समिती कार्यालय वडसा (देसाईगंज) येथे माहिती अधिकार कायद्याबाबत भव्य प्रबोधन व प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत पंचायत समितीतील अधिकारी-कर्मचारी, तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. या कार्यशाळेत प्रमुख प्रबोधक म्हणून मा. मनोज उराडे, जिल्हाध्यक्ष, माहिती अधिकार पत्रकार संरक्षण व पोलीस मित्र समिती यांनी सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी माहिती अधिकार कायद्याच्या विविध तरतुदी, त्याचे महत्त्व तसेच नागरिकांना मिळणारे हक्क यावर प्रकाश टाकला. “शासकीय कामकाजात पारदर्शकता व उत्तरदायित्व आणण्यासाठी हा कायदा नागरिकांसाठी प्रभावी हत्यार ठरतो,” असे स्पष्ट करताना त्यांनी ठोस उदाहरणांनी सर्वांचे प्रबोधन केले. कार्यक्रमाच्या अतिथी म्हणून सौ. अनुपमा रॉय ,समितीच्या तालुकाध्यक्ष उपस्थित होत्या. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी मा. प्रणाली खोचरे, गटविकास अधिकारी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुयोग्य सूत्रसंचालन श्री. संतोष मसराम, सहायक प्रशासकीय अधिकारी यांनी केले तर आभार प्रदर्शन मा. कावळे सर यांनी मानले.
कार्यशाळेच्या शेवटी सर्व मान्यवरांनी माहिती अधिकार कायद्याचा प्रसार व जनजागृती करण्याचे आवाहन केले. तसेच गावोगाव या कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करून पारदर्शक व जबाबदार प्रशासन उभे करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. या कार्यक्रमामुळे अधिकारी-कर्मचारी व पदाधिकाऱ्यांमध्ये माहिती अधिकार कायद्याबद्दल जागरूकता, जबाबदारीची जाणीव आणि नवी ऊर्जा संचारली.
प्रतिनिधी
जोत्सना मिसार