*ॲग्रिस्टॅक अंतर्गत अनाधिकृत ‘शेतकरी ओळखपत्र’ वितरणापासून सावध रहा*

32

*ॲग्रिस्टॅक अंतर्गत अनाधिकृत ‘शेतकरी ओळखपत्र’ वितरणापासून सावध रहा*

 

गडचिरोली: दि. १ : – शासनाच्या ॲग्रिस्टॅक उपक्रमांतर्गत शेतकरी नोंदणीसाठी डिजिटल शेतकरी ओळखपत्र (Digital Farmer ID) तयार करण्यात येत आहे. मात्र, या संदर्भात भौतिक/ऑफलाइन ‘शेतकरी ओळखपत्र’ अधिकृतपणे मान्य करण्यात आलेले नाही आणि कोणत्याही संस्थेस ते वितरित करण्याची परवानगी नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांच्या निदर्शनास आले आहे की, काही जिल्ह्यांमध्ये सीएससी (CSC)/सेवा केंद्रे आणि संबंधित संस्थांकडून अनधिकृतपणे भौतिक शेतकरी ओळखपत्र’ जारी केले जात आहेत.

परवानगीशिवाय अशा प्रकारे शेतकरी ओळखपत्र जारी करणे ही अत्यंत गंभीर बाब आहे आणि त्याचा गैरवापर होण्याची शक्यता आहे.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रिती हिरळकर यांनी याबद्दल स्थानिक शेतकऱ्यांनी जागरूक राहण्याचे आवाहन केले असून कोणत्याही संस्थेला ‘शेतकरी ओळखपत्र’ छापण्याची, वितरित करण्याची किंवा त्याची प्रत प्रसारित करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही, असे त्यांनी कळविले आहे.