*ग्रामपंचायत,जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा व लोकमान्य विद्यालय मुरखळा (माल) यांच्या संयुक्त विद्यमाने मुरखळा (माल) येथील ग्रामपंचायतीच्या प्रांगणात राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली*. 👉आज दिनांक 2/10/2025 रोज गुरूवार ला सकाळी 8.30 वाजता ग्रामपंचायत मुरखळा (माल) येथील प्रांगणात *राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती* मुरखळा(माल) ग्रामपंचायत चे सन्माननीय *सरपंच श्री भास्कर बुरे, उपसरपंच लक्ष्मीताई सालोरकर,ग्रामपंचायत अधिकारी आर.के.बारसागडे,ग्रामपंचायत सदस्या श्रीमती अर्चना नैताम,मुरखळा(माल) येथील प्रतिष्ठित नागरिक श्री नागापुरे महाराज,लोकमान्य विद्यालय चे मुख्याध्यापक श्री प्रकाश पत्रे सर,श्री यादव बुरे,श्री गणपत सातपुते, माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री विजय राजूरवार,जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुरखळा (माल) शाळेतील पदवीधर शिक्षक तथा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष श्री रघुनाथ भांडेकर सर*, सहायक शिक्षक श्री प्रमोद आत्राम सर,श्री चंद्रकांत वेटे सर,श्री राजकुमार कुळसंगे सर,सौ.सोनिताई संदोकार मॅडम,*लोकमान्य विद्यालय चे शिक्षक वृंद श्री शेट्ये सर,श्री चहारे सर,श्री इंगुलवार सर, डॉ.शिंदे,विनोद बाविस्कर, ग्रामपंचायत मुरखळा(माल )चे कर्मचारी वृंद* संगणक परिचालक सुषमा मडावी,श्री शामराव निशाणे,श्री सचिन तुंबडे,श्री राकेश नैताम,श्री मानिक घोगरे, *शालेय पोषण आहार मदतनीस* श्रीमती पुष्पा मोहुरले, यांचे प्रमुख उपस्थितीत राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.या जयंती कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आजच्या या जयंती कार्यक्रमानिमित्त सर्वप्रथम गावातील मुख्य मार्गावरुन प्रभातफेरी काढण्यात आली.प्रभातफेरीतुन स्वच्छता विषयक जाणीव जागृती करण्यात आली.तसेच *स्वच्छता हीच सेवा* या उपक्रमाअंतर्गत जयंती निमित्ताने शाळाअंतर्गत व शाळेबाहेरील परिसर तसेच बाजाराच्या जागेतील परिसर स्वच्छ करण्यात आले.आजच्या जयंती कार्यक्रमानिमित्त उपस्थित प्रमुख पाहुणे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवन कार्यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तसेच शाळेतील विविध वर्गातील १० विद्यार्थ्यांनी जयंती निमित्त भाषणे दिली.आजच्या जयंती कार्यक्रमाचे *प्रास्ताविक* श्री चंद्रकांत वेटे सर यांनी केले, *सूत्रसंचालन* इयत्ता ७ वी ची विद्यार्थिनी कु.चैतन्या गटलेवार हिने केले.*आजच्या जयंती कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत मुरखळा(माल)चे सरपंच श्री भास्कर बुरे होते* तर कार्यक्रमातील उपस्थित पाहुण्यांचे *आभार* शालेय मुख्यमंत्री इयत्ता ७ वी चा विद्यार्थी पवन सरपे यांनी मानले.कार्यकमाची सांगता उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करुन करण्यात आली.
Home Breaking News *ग्रामपंचायत,जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा व लोकमान्य विद्यालय मुरखळा (माल) यांच्या संयुक्त...