*_शिवकृपा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन;_*

83

*_शिवकृपा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन;_*

—————————————-

*_मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांच्या हस्ते पूजन-अर्चा_*

 

गडचिरोली (दि. २ ऑक्टोबर २०२५):

गडचिरोली शहरातील नावाजलेले शिवकृपा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय याच्या नव्या इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन व पूजा-अर्चा विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर या महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष तसेच माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते व त्यांच्या पत्नी सौ. अर्चना नेते यांच्या उपस्थितीत मंगलमय वातावरणात पार पडले.

 

गडचिरोली जिल्हा शैक्षणिक क्षेत्रात सतत प्रगती करावा, विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात तसेच आदिवासी बहुल जिल्ह्यातील तरुणाईला शिक्षणाची गोडी लागावी, या हेतूने नव्या वास्तूचे बांधकाम सुरू करण्यात येत आहे.

 

गडचिरोली हा नक्षलग्रस्त व आकांक्षित जिल्हा म्हणून ओळखला जात असला, तरी येथे शिक्षणाची नवी ज्योत प्रज्वलित करण्यासाठी शिवकृपा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाने महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोकजी नेते यांनी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी नूतन वास्तू उभारण्याचा संकल्प व्यक्त केला.

 

या भूमिपूजन सोहळ्यात मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणयजी खुणे, भाजप नेते डॉ. भारत खटी, पूजा-अर्चा करणारे नाना आमगांवकर महाराज, कंत्राटदार चव्हाण, प्राचार्य दुर्गम, महादेव पिपळशेंडे यांच्यासह महाविद्यालयीन प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

कार्यक्रमानंतर मा.खा.डॉ. नेते म्हणाले की,”गडचिरोली जिल्हा शैक्षणिक क्षेत्रात मागे राहू नये, तर येथील विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधा व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, हा या नव्या वास्तूचा मुख्य उद्देश आहे.”