*जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आरक्षण सोडतीसाठी १३ ऑक्टोबर रोजी विशेष सभा*

46

*जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आरक्षण सोडतीसाठी १३ ऑक्टोबर रोजी विशेष सभा*

 

 

गडचिरोली, (जिमाका) दि. १० ऑक्टोबर : महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ मधील तरतुदीनुसार तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पद्धत व चक्रानुक्रम) नियम, २०२५ नुसार जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील जागांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी विशेष सभांचे आयोजन करण्यात आले आहे. या सभांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व त्यामधील महिलांसाठी तसेच सर्वसाधारण महिलांसाठी राखीव जागांचे आरक्षण ठरविण्यात येणार आहे.

 

सदर आरक्षण ठरविण्याची प्रक्रिया सोडत पद्धतीने पार पडणार असून, त्यासाठी पुढीलप्रमाणे तालुकानिहाय सभा आयोजित करण्यात आल्या आहेत —

 

कोरची, कुरखेडा, देसाईगंज, आरमोरी, धानोरा, गडचिरोली, चामोर्शी, मुलचेरा, एटापल्ली, भामरागड, अहेरी आणि सिरोंचा या १२ पंचायत समित्यांकरिता तहसील कार्यालयात १३ ऑक्टोबर २०२५ रोजी सभा घेण्यात येईल.

कुरखेडा, देसाईगंज, गडचिरोली, चामोर्शी, एटापल्ली, अहेरी आणि सिरोंचा या ठिकाणी सभा सकाळी ११.०० वाजता तर कोरची, आरमोरी, धानोरा, मुलचेरा आणि भामरागड येथे सभा दुपारी ३.०० वाजता आयोजित करण्यात आल्या आहेत.

 

सदर सभांना जिल्हा परिषद व पंचायत समितीतील इच्छुक रहिवाशांनी उपस्थित राहून सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.