किमान कौशल्य विकास कार्यक्रम अंतर्गत जनरल डयुटी असिस्टंट करीता नाव नोंदणी करण्याचे आवाहन

73

किमान कौशल्य विकास कार्यक्रम अंतर्गत जनरल डयुटी असिस्टंट करीता नाव नोंदणी करण्याचे आवाहन

गडचिरोली, (जिमाका) दि.10 ऑक्टोबर : जिल्हा वार्षिक योजना सन 2025-26 अंतर्गत किमान कौशल्य विकास कार्यक्रम योजना सन 25-26 निवड झालेल्या प्रशिक्षण झालेल्या प्रशिक्षण संस्था अंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथील मंजूर General Duty Assistant या प्रशिक्षणाकरीता प्रशिक्षणार्थी म्हणून नाव नोंद करण्याकरीता 11 ऑक्टोबर 2025 ते 17 ऑक्टोबर 2025 पर्यत रुग्णालय प्रशिक्षण केंद्र, सा. रु. गडचिरोली येथे इच्छुक उमेदवारांनी आपले नाव नोंदवावे.

उमेदवाराकरीता सुचना पुढीलप्रमाणे आहेत- उमेदवार गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी असावा. उमेदवार 10 वी पास/नापास वरील शिक्षण घेतलेले असावा. उमेदवार 3 महिन्याचे प्रशिक्षण जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे पुर्ण करण्यास समर्थ असावा. मुळ कागदपत्रासोबत (आधार कार्ड/रहिवासी दाखला/जात प्रमाणपत्र/कौशल्य विकास कार्यक्रम अंतर्गत नोंदी केलेला कार्ड) नाव नोंदणीकरिता रुग्णालय प्रशिक्षण केंद्र, सा.रु. गडचिरोली येथे 11 ऑक्टोबर 2025 ते 17 ऑक्टोबर 2025 पर्यत नाव नोंदवावे. असे जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, गडचिरोली यांनी कळविले आहे.

0000