सावली : डोंगरगाव मस्के वासिय घरकुल धारकांना पट्टेवाटप,अखेर जितू धात्रक यांच्या लढ्याला यश
आमदार सुधीर मुनगंटीवार,आमदार किशोर जोर्गेवार ,जिल्हाधिकारी चंद्रपूर ह्यांच्या हस्ते पट्टे वाटप
सावली तालुक्यातील डोंगरगाव मस्के येथे मागील ३० वर्षापासून लोकांनी आपली घरे बांधली आहेत. त्यांचा १९७१ मधे त्यात गावठाण मधे सुद्धा जागा आली होती. तिथे शासकीय नियमानुसार लेआउट सुद्धा पडले होते. राहणाऱ्या लोकांचे घर टॅक्स सुद्धा मागील वीस वर्षापासून लागून आहेत. परंतु तिथे त्यांच्याकडे पट्टा नसल्यामुळे त्यांना आता बऱ्याच लोकांना घरकुल आले आहेत परंतु पट्टे नसल्यामुळे त्यांना आलेले घरकुल सुद्धा परत जात होते. तसेच ज्यांचे घर आहेत घर टॅक्स आहे परंतु पट्टे नसल्यामुळे काही लोकांना घरकुल सुद्धा मंजूर होत नव्हते.
त्याच्याविरोधात जितू धात्रक तसेच डोंगरगाव मस्के वासीय यांनी काही महिन्यापूर्वी तहसीलदार सावली इथे मोठा आंदोलन सुद्धा केला होता. आणि त्यामुळेच नंतर त्यावर कारवाई चालू झाली.आणि जितू धात्रक तसेच डोंगरगाव मस्के वासीय यात प्रामुख्याने भुजंगजी मस्के तसेच इतर गावकरी हे मागील सहा महिन्यांपासून योग्य पाठपुरावा करीत होते. त्यामुळे पूर्ण महसूल कर्मचारी सुद्धा ह्यात मदत करून डोंगरगाव मस्के येथील जवळपास आता १८ पट्टे मिळाले आहेत.दि. ४ ऑक्टोबर २०२५ रोजी मान्यवरांच्या हस्ते पट्टे वाटप करण्यात आले.पट्टे वाटपाचा कार्यक्रम प्रियदर्शिनी हाल चंद्रपूर येथे झाला.
ज्यांना घरकुल आले आहेत आणि उर्वरित सुद्धा त्यांची पुन्हा चौकशी चालू आहे लवकरच त्यांना सुद्धा शासकीय नियमानुसार चौकशी करून पट्टे देण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त आहे.