एटापल्ली तालुक्यात पदवीधर नोंदणी व आगामी निवडणुकांची तयारीबाबत मार्गदर्शन सभा

71

एटापल्ली तालुक्यात पदवीधर नोंदणी व आगामी निवडणुकांची तयारीबाबत मार्गदर्शन सभा

 

एटापल्ली तालुक्यातील जारावंडी येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने पदवीधर मतदार संघ नोंदणीसंदर्भात तसेच येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तयारीसाठी मार्गदर्शन सभा आयोजित करण्यात आली.

 

या सभेत पदवीधर नोंदणी प्रमुख तथा तालुका युवा मोर्चा अध्यक्ष श्री. यवन पुलके यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पदवीधर नोंदणी प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

 

या वेळी तालुका अध्यक्ष श्री. प्रसाद चंद्रशेखर पुल्लूरवार, तालुका महामंत्री श्री. राकेश सुशील हिरा, तसेच तालुका कार्यकारिणी सदस्य श्री. मुकेशभाऊ कावडे व श्री. योगेशभाऊ कुंमरे , प्रनीत पैदापल्लीवार महामंत्री युवा मोर्चा भाजपा, प्रफुल सोनूले उपाध्यक्ष युवा मोर्चा भाजपा, प्रणित गेडाम सचिव युवा मोर्चा भाजपा उपस्थित होते.

 

सभेत जिल्हा परिषद क्षेत्रातील ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते व युवा मोर्चा पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

बैठकीत येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बुथ समिती गठन, मतदार नोंदणी तसेच संघटन बळकटीकरणाचे नियोजन करण्यात आले.

 

या प्रसंगी तालुका अध्यक्ष प्रसाद पुल्लूरवार यांनी सर्व कार्यकर्त्यांना संघटन मजबूत करण्याचे आणि प्रत्येक बुथ पातळीवर सक्रियपणे काम करण्याचे आवाहन केले.

 

👉 ही सभा अत्यंत उत्साही वातावरणात पार पडली असून येणाऱ्या निवडणुकांसाठी तालुका कार्यकर्त्यांनी नवउमेद घेऊन तयारीला सुरुवात केली आहे.