Home गडचिरोली गडचिरोलीतील वनाधिकाऱ्याच्या महिला वनरक्षकाशी असलेल्या जाहीर प्रेमप्रकरणाच्या प्रदर्शनाची दखल घेत जिल्ह्यधिकाऱ्यांनी तातडीने...

गडचिरोलीतील वनाधिकाऱ्याच्या महिला वनरक्षकाशी असलेल्या जाहीर प्रेमप्रकरणाच्या प्रदर्शनाची दखल घेत जिल्ह्यधिकाऱ्यांनी तातडीने स्थानांतरनाची केली शिफारस

528

गडचिरोलीतील वनाधिकाऱ्याच्या महिला वनरक्षकाशी असलेल्या जाहीर प्रेमप्रकरणाच्या प्रदर्शनाची दखल घेत जिल्ह्यधिकाऱ्यांनी तातडीने स्थानांतरनाची केली शिफारस

प्रेमात आंधळ्या झालेल्या प्रेमवेड्या प्रेमीयुगलाची वसाहतीच्या परिसरात खमंग चर्चा

प्रेमाचे जाहीर प्रदर्शनाने वसाहतीतील लोक त्रस्त

गडचिरोली .

येथील सामाजिक वनीकरण विभागातील एक अधिकाऱ्याचे महिला वनरक्षकाशी प्रेमाचे सूत घट्ट जुळल्याने स्थानांतरण होऊनही येथून हलायला तयार नव्हता. त्यांच्याबाबतची निनावी तक्रार जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांना प्राप्त झाल्याने अखेर जिल्हाधिकारी सिंगला यांनीच वनविभागाच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना तक्रारीचे पत्र पाठवून या प्रेमवेड्या अधिकाऱ्याची उचलबांगडी करण्याची मागणी केली आहे.

येथील वनविभागाच्या सामाजिक वनीकरण विभागात वनाधिकारी असलेले हे अधिकारी वनवसाहत परिसरातील शासकीय बंगल्यात वास्तव्याला आहेत. त्यांची बदलीसुद्धा झाली. दरम्यान येथीलच एका महिला वनरक्षकाशी त्यांचे प्रेमसंबंध जुळले. आणि वसाहतीत यांच्या प्रेमप्रकरणाची जोरदार चर्चा रंगली. आणि वसाहतीच्या परिसरात अगदी बेधडकपणे प्रेमाचे जाहीर प्रदर्शनाने वसाहतीतील लोक त्रस्त होते.

त्यापैकी कुणीतरी जिल्हाधिकारी सिंगला यांच्याकडे या प्रकाराची निनावी तक्रार केली. जिल्हाधिकाऱ्यांनी या तक्रारीची दखल घेत अपर मुख्य सचिव, वने (महसूल व वनविभाग) मंत्रालय, मुंबई, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, नागपूर, वनसंरक्षक (प्रादेशिक), गडचिरोली, वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण, नागपूर यांना पत्र पाठवून या वनाधिकाऱ्याला गडचिरोली जिल्ह्यातून तत्काळ पदमुक्त करून बदली झालेल्या ठिकाणी किंवा इतर ठिकाणी बदली करण्याची शिफारस केली आहे.

Don`t copy text!