*_गडचिरोलीत नव्या ऊर्जेचा संचार! शेकडो युवकांचा उत्साहपूर्ण भाजपात पक्षप्रवेश — माजी खासदार डॉ. अशोकजी नेते आणि आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा संपन्न!_*
गडचिरोली, दि. ०५ नोव्हेंबर २०२५
गडचिरोली शहरात आज भारतीय जनता पार्टीचा भव्य पक्षप्रवेश सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि ऊर्जावान वातावरणात पार पडला.
देशाचे लोकप्रिय, दूरदर्शी आणि विकासाभिमुख नेतृत्व करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, राज्याचे कार्यकुशल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांच्या प्रेरणेतून नव्या पिढीतील असंख्य तरुणांनी भाजपच्या विचारधारेवर विश्वास ठेवत पक्षात प्रवेश केला.
*कर्तव्य कक्षात उत्साहाचा जल्लोष*
आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांच्या कर्तव्य कक्ष जनसंपर्क कार्यालय, गडचिरोली येथे झालेल्या या भव्य सोहळ्यात शहरातील नवयुवक, कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उत्साहात सहभाग घेतला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते होते, तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे उपस्थित होते.
या प्रसंगी भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधाकरजी येंगदलवार, शहराध्यक्ष अनिल कुनघाडकर, तालुकाध्यक्ष दत्तु सुत्रपवार, प्रा. सतिश चिचघरे, अनिल करपे, आकाश गेडाम आदी मान्यवर उपस्थित होते.
गडचिरोली शहरातील युवक शुभम बाळेकरमकर, रविजी कांबळे, विजय बारापात्रे यांच्यासह शेकडो युवक कार्यकर्त्यांनी आणि महिला भगिनींनी भारतीय जनता पक्षाचा दुपट्टा स्विकारत “विकासाच्या प्रवासात सहभागी होऊ” अशी घोषणा केली.
नव्या कार्यकर्त्यांच्या या प्रवेशामुळे गडचिरोली जिल्ह्यात भाजपाचा विस्तार आणखी वेगाने होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी मार्गदर्शन करताना माजी खासदार डॉ. अशोकजी नेते म्हणाले — “भारतीय जनता पक्ष हा एक मोठा राजकीय पक्ष आहे.त्याचे तुम्ही पदाधिकारी व कार्यकर्ते आहात ही मानसन्मानाची बाब आहे. मोदीजी आणि फडणवीसजींच्या नेतृत्वाखाली भारत आत्मनिर्भरतेकडे झेपावत आहे. भाजप कार्यकर्ता असणे ही केवळ जबाबदारी नाही, तर ती एक सन्मानाची बाब आहे.
गडचिरोलीतील या उत्साहवर्धक पक्षप्रवेशामुळे भाजप परिवार अधिक सबळ आणि जनतेच्या विश्वासाशी घट्ट जोडला गेला आहे.”
भविष्यातील दिशा — विकास आणि जनसेवेचा संकल्प
“सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास” या भाजपच्या विकासधर्माला अनुसरून गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीच्या अभियानाला नव्या जोमाने आणि नव्या उमेदीनं गती मिळणार आहे, असा ठाम विश्वास सर्व मान्यवरांनी व्यक्त केला.
भाजपाच्या विचारधारेवर श्रद्धा ठेवून नव्या ऊर्जेने पक्षात दाखल झालेल्या तरुणांच्या या लाटेमुळे गडचिरोलीत राजकीय जनजागृतीचा आणि विकासाच्या प्रवासाचा नवा अध्याय सुरू झाला आहे.






