Home Breaking News *जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुरखळा (माल‌‌‌) येथे शाळा स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे...

*जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुरखळा (माल‌‌‌) येथे शाळा स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन*

111

*जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुरखळा (माल‌‌‌) येथे शाळा स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन*

*मुरखळा (माल) दिनांक:-६ नोव्हेंबर २०२५*

 

*LLF* यांच्या मार्गदर्शनाखाली आणि *NPCI* च्या सहकार्याने आज दिनांक – ६/११/२०२५ ला *जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा,मुरखळा (माल)* येथे *शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे* आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनात शाळेतील विविध वर्गांतील विद्यार्थ्यांनी आपापले नाविन्यपूर्ण आणि अभ्यासपूर्ण प्रकल्प सादर करून विज्ञानाची आवड,कल्पकता आणि प्रयोगशीलता यांचा उत्तम संगम दाखवून दिला.

 

विज्ञान प्रदर्शनाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करणे, विचारशक्तीला चालना देणे तसेच ‘शिकताना अनुभवातून ज्ञान मिळविणे’ या तत्त्वाची जाणीव करून देणे हा होता. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पांमध्ये **जलशुद्धीकरण यंत्रणा, सौरऊर्जा वापर, पर्यावरणपूरक कृती, शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान, गणिती संकल्पनांचे मॉडेल, ज्वालामुखीचा प्रत्यक्ष नमुना, 3D हेलोजन मॉडेल, हँड वॉश प्रक्रिया, चुंबकाचे प्रयोग** आदींचा समावेश होता.

 

प्रदर्शनाला विद्यार्थ्यांसोबत शिक्षक,पालक यांची उपस्थिती लाभली.उपस्थित पाहुण्यांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे आणि मेहनतीचे मनापासून कौतुक केले.या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित ज्ञान न राहता त्याचे प्रत्यक्ष जीवनातील उपयोग आणि महत्त्व समजले.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक *श्री जी. के.बोईनवार होते.प्रमुख उपस्थिती पदवीधर शिक्षक श्री आर.एम.भांडेकर,श्री सि.एम.वेटे, श्री जे.जी.कलाम, श्री आर.जी.कुळसंगे* यांनी दर्शविली. तसेच *NPCI व LLF* यांच्या प्रशिक्षिका *कु. प्रतिक्षा किरमिरे* आणि *कु. निशा उमरगुंडावर* यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले व त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

 

प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी आपले प्रकल्प सविस्तरपणे मांडून त्यामागील वैज्ञानिक तत्त्व स्पष्ट केले. शिक्षकांनी त्यांना योग्य मार्गदर्शन करून विविध प्रश्न विचारले, ज्यामुळे विद्यार्थ्यांची आत्मविश्वासाने उत्तर देण्याची क्षमता वृद्धिंगत झाली.

 

या उपक्रमामुळे शाळेत विज्ञानविषयक वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांमध्ये निरीक्षण, विचार, प्रयोग आणि निष्कर्ष काढण्याची सवय निर्माण झाली आहे. यामुळे त्यांच्या वैचारिक क्षमतेसह भविष्यातील संशोधनात्मक दृष्टिकोन अधिक मजबूत होईल.

कार्यक्रमाचे संचालन इयत्ता ७वी ची विद्यार्थिनी *कु.चैतन्या गटलेवार* तर आभार प्रदर्शन इयत्ता ७वी चा विद्यार्थी *पवन सरपे* यांनी केले. विज्ञान प्रदर्शनाच्या शाळा स्तरीय यशस्वी आयोजनामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानविषयक जाणिव जागृती,उत्कंठा आणि शोधभावना अधिक दृढ झाली आहे.

Don`t copy text!