विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बौद्ध समाज फुले वार्ड गडचिरोली व प्रहार जनशक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन
गडचिरोली:- मागील वर्षा पासुन कोरोना च्या महामारी मुळे तसेच सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्याने रक्तदान हे कमी होत असते त्यामुळे रक्तपेढी गडचिरोली येथे रक्ताची खूपच कमतरता भासत आहे.गडचिरोली हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने संपूर्ण जिल्ह्यातील लोक हे उपचारा करिता सामान्य जिल्हा रुग्णालयात गडचिरोली येथे येतात व रक्ताची तुटवडा भासतो
त्या करिता बौध्द समाज फुले वॉर्ड गडचिरोली व प्रहार जनशक्ति पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आज फुले वॉर्ड गडचिरोली येथे प.पु. महामानव विश्वरत्न क्रांतीसूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंती दीना निमित्त रक्तदान शिबीरचे आयोजन करण्यात आले यात तरुणांनी रक्तदान करून खऱ्या अर्थाने जयंती दिनी मानवंदना दिली,
या शिबिरा दरम्यान सर्वप्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून, फित कापून रक्तदान शिबीराला सुरुवात करण्यात आली,या शिबिरात युवकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.
या रक्तदान शिबिरात जि. प. सदस्य ॲड. राम मेश्राम, गडचिरोली शहराचे पोलीस पाटील अनिल खेवले, नगरसेविका माधुरी खोब्रागडे, नगरसेवक प्रशांत खोब्रागडे उपस्थित होते.
या प्रसंगी आयोजक संकेत गड्डमवार, निखिल वाकडे, अमोल खोब्रागडे तसेच प्रहार चे पदाधिकारी विनोद जांभूळकर, अक्षय मेश्राम, स्वप्निल गौतम व समस्त बौद्ध समाज फुले वॉर्ड उपस्थित होते
या शिबिरात आरोग्य कर्मचारी
डॉ डोंगरे मॅडम , पिआरो सतीश तडकलावार, टेक्निशियन स्वप्निल चापले, अधीपरीचारिका ज्योती गेडेकर, मुरलीधर पेद्दिवार, भूपेंद्र आदी उपस्थित होते.
शिबिरात एकूण 26 रक्तदात्यांनी रक्तदान केले.त्यांनी जपलेल्या सामाजिक बांधिलकी बद्दल आयोजक व इतर पदाधिकाऱ्यांनी रक्तदात्यांचे आभार मानले व त्यांना शुभेच्छा देण्यात आले.