आष्टी पोलीसांनी कोरोनाच्या जनजागृती साठी काढला रूट मार्च.

285

आष्टी पोलीसांनी कोरोनाच्या जनजागृती साठी काढला रूट मार्च.

आष्टी-
चामोर्शी तालुक्यातील आष्टी पोलीस स्टेशनच्या वतीने दिनांक 15 एप्रिल रोजी शहरात रूट मार्च काढण्यात आला.

कोरोना विषाणू पासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहन यावेळी करण्यात आले.वाढत्या कोरोना रुग्णामुळे सरकारने 15 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत लाकडाऊन जाहीर केला.त्या पार्श्वभूमीवर लोकांनी अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे अन्यथा घराबाहेर पडू नये व अत्यावश्यक सेवेतील व्यापारी बांधवांनी कोविड नियमांचे पालन करावे व सर्व नागरिकांनी याला उत्तम प्रतिसाद दयावा असे यावेळी आष्टी ग्रामपंचायत, महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले.

आष्टी पोलीस स्टेशनच्या सर्व पोलीस जवानांनी पोलीस स्टेशन ते आंबेडकर चौक.आंबेडकर चौक ते आलापल्ली चामोर्शी रोड वरून रूट मार्च काढला.व जनजागृती केली यावेळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार राठोड सर, पोलीस उपनिरीक्षक गणेश जंगले, आष्टी येथील तलाठी सचिन गुरुनूले,व ग्रामपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.