Home Breaking News शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावल्या जाणार, लढण्याची तयारी ठेवा  भाई...

शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावल्या जाणार, लढण्याची तयारी ठेवा  भाई रामदास जराते यांचे शेतकऱ्यांना आवाहन

204

 

शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावल्या जाणार, लढण्याची तयारी ठेवा

 

भाई रामदास जराते यांचे शेतकऱ्यांना आवाहन

 

गडचिरोली : भांडवलदारांचे हित असलेला विकास जिल्ह्यात आणल्या जात आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या शेतजमीनी हिसकावल्या जाणार आहेत. नेत्यांच्या मागे धावून आपल्या शेतजमिनी वाचणार नाहीत. त्यासाठी शेतकऱ्यांनी स्वता:च लढण्याची तयारी ठेवावी असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते यांनी केले.

 

तालुक्यातील मुडझा येथे महर्षी वाल्मिकी ॠषीच्या मंदिराच्या मदतनिधी करीता आयोजित नाटकाच्या उद्घाटनप्रसंगी ते अध्यक्षस्थाना वरून बोलत होते. केंद्र सरकारने रोजगार हमी योजनेच्या कायद्यात दुरुस्तीच्या नावाखाली गरिबांच्या हाताला मिळणारे रोजगार नाकारण्याचे कारस्थान रचले असल्याची टिकाही यावेळी भाई रामदास जराते यांनी केली. शेतकरी कामगार पक्षाच्या महिला नेत्या जयश्रीताई जराते व ढिवर समाज संघटनेचे जिल्हा सचिव किशोर बावणे यांच्या हस्ते या नाटकाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुडझाचे सरपंच शशिकांत कोवे, आझाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, शेकापचे खजिनदार भाई शामसुंदर उराडे, जिल्हा समिती सदस्य डॉ. गुरुदास सेमस्कर, भटक्या विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष डंबाजी भोयर, तुलाराम राऊत, तंमुस अध्यक्ष श्रीहरी चौधरी, उपसरपंच शोभाताई जेंगठे, ग्रा.प.सदस्य विवेक बारसिंगे, संजय चौधरी, गौरव सोनूले, राजू चौधरी, किशोर ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते.

 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे उपाध्यक्ष लक्ष्मण शेंडे, सचिव खुशाल मेश्राम, बाळु शेंडे, रविंद्र शेंडे, प्रभाकर भोयर, विठ्ठल मेश्राम, पंकज शेरकी, पद्माकर कांबळे, विजय शेंडे, किरण भोयर, उमाजी शेंडे, विलास शेरकी, क्रीष्णा भोयर, क्रीष्णा शेंडे, लखन शेरकी, अजय भोयर, विठ्ठल भोयर, शिक्षक बोरीकर यांनी परिश्रम घेतले.

Don`t copy text!