इंदापूर तालुक्याचा हरीश डोंबाळे अभिमान – कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

38

इंदापूर तालुक्याचा हरीश डोंबाळे अभिमान – कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

 

 

इंदापूर प्रतिनिधी गणेश धनवडे

 

इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात प्रथम वर्ष कला शाखेत शिक्षण घेत असलेला न्हावी ता. इंदापूर येथील हरीश दिपक डोंबाळे यांनी ओडिसा संबलपूर येथे संपन्न झालेल्या ३० व्या राष्ट्रीय रोड रेस १०० किमी सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया स्पर्धेत ज्युनिअर वयोगटातुन देशात प्रथम क्रमांक व उत्तराखंड रुद्रपुर येथे ट्रॅक स्पर्धेत टीम स्प्रिंटमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते हरीश डोंबाळे याचा भरणेवाडी ता. इंदापूर येथे सन्मान करण्यात आला.यावेळी इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे सचिव विरसिंह रणसिंग, हरीश चे वडील दिपक ,आई आशा ,आजोबा इ मान्यवर व न्हावी गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी भरणे यांनी सायकलिंग स्पर्धेत देशात हरीश ने महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले असून हरीश इंदापूर तालुक्याचा अभिमान असल्याचे सांगितले.हरीश च्या यशाबद्द्ल त्याचे कौतुक करीत आई वडील आजोबा व संस्था सचिव विरसिंह रणसिंग यांचे अभिनंदन केले. हरीश ने जिद्दीने १०० किलोमीटर मास्टर्स सायकलिंग स्पर्धेत भारतात प्रथम क्रमांक सुवर्ण पदक मिळवून विश्वासराव रणसिंग महाविद्यालयाचा नावलौकिक केला असल्याचे सचिव विरसिंह रणसिंग यांनी सांगितले.