मा. मुख्यमंत्री म.रा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जल्लोषपूर्ण व उत्साहाच्या वातावरणात पार पडले ‘गडचिरोली महोत्सव व महा मॅरेथॉन 2025’

45

 

मा. मुख्यमंत्री म.रा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जल्लोषपूर्ण व उत्साहाच्या वातावरणात पार पडले ‘गडचिरोली महोत्सव व महा मॅरेथॉन 2025’

 

 

* 14 हजारहुन अधिक युवक-युवती व नागरिकांचा सहभाग

* 21 कि.मी. मध्ये पुरुष गटात चामोर्शीचा रोशन बोदलकर तर महिला गटात अहेरीच्या साक्षी पोलादवारने मारली बाजी

* मा. मुख्यमंत्री म.रा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते माओवादी विरोधी अभियान पेट्रोलिंग करीता प्राप्त 32 चारचाकी वाहनांचा लोकार्पण सोहळा संपन्न

* नूतन वरिष्ठ अधिकारी विश्रामगृहाचे मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले भूमीपूजन समारंभ

* मा. मुख्यमंत्री म.रा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले गडचिरोली पोलीस दलाच्या सन 2026 च्या टेबल कॅलेंडरचे विमोचन

* मा. राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री गडचिरोली जिल्हा अॅड. श्री. आशिष जयस्वाल यांच्या उपस्थितीत पार पडली महामॅरेथॉन स्पर्धा

* प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत गडचिरोली महोत्सवाची सांगता

 

गडचिरोली जिल्हा हा अतिदुर्गम, माओवादग्रस्त व आदिवासी बहुल असून येथील आदिवासी नागरीकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरीता, गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने ‘प्रोजेक्ट उडान’ च्या माध्यमातून विविध शासकिय योजना मिळवून देत विकासाच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. गडचिरोली जिल्ह्रातील आदिवासी बांधवांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच आदिवासी संस्कृतीचे जतन करण्याकरीता व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने दिनांक 25/12/2025 ते 27/12/2025 या काळात गडचिरोली पोलीस दलामार्फत “गडचिरोली महोत्सव” चे शासकीय कृषी महाविद्यालय, गडचिरोली येथे आयोजन करण्यात आले होते. यासोबतच गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने ‘एक धाव आदिवासी विकासासाठी’ या संकल्पनेतून मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 28/12/2025 रोजी जिल्हा परिषद मैदानावर भव्य महामॅरेथॉन 2025 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

 

गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गडचिरोली महोत्सवामध्ये, आदिवासी समूह नृत्य स्पर्धा, वीर बाबुराव शेडमाके कब्बड्डी स्पर्धा व बिरसा मुंडा व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये दुर्गम व अतिदुर्गम भागातून आलेल्या संघामध्ये अत्यंत चुरशीच्या लढती नागरिकांना पहावयास मिळाल्या. यातील वीर बाबुराव शेडमाके कब्बड्डी स्पर्धेमध्ये प्रथम- जय सेवा कबड्डी संघ धानोरा जि. गडचिरोली, द्वितीय- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मंडळ, आष्टी जि. गडचिरोली व तृतीय- युवा मंडळ संघ, साखेरा यांनी क्रमांक पटकावला असुन विजेत्यांना अनुक्रमे 35,000/-, 30,000/- व 25000/- रु. रोख, ट्रॉफी, पदक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यासोबतच भगवान बिरसा मंुडा व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये प्रथम- जय बजरंग व्हॉलीबॉल क्लब डुम्मे एटापल्ली जि. गडचिरोली, द्वितीय- स्पंदन फाऊंडेशन क्लब, गडचिरोली व तृतीय- आर.डी. क्लब अहेरी यांनी क्रमांक पटकावला असुन विजेत्यांना अनुक्रमे 35,000/-, 30,000/- व 25000/- रु. रोख, ट्रॉफी, पदक, रेला नृत्य स्पर्धेमध्ये प्रथम- जय बजरंग व्हॉलीबॉल क्लब डुम्मे एटापल्ली जि. गडचिरोली, द्वितीय- स्पंदन फाऊंडेशन क्लब, गडचिरोली व तृतीय- आर.डी. क्लब अहेरी यांनी क्रमांक पटकावला असुन विजेत्यांना अनुक्रमे 35,000/-, 30,000/- व 25000/- रु. रोख, ट्रॉफी, पदक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. सदर गडचिरोली महोत्सवामध्ये गडचिरोली जिल्ह्रातील विविध बचत गट आणि विविध संस्था आपल्या उत्पादनाचे व वस्तुंचे स्टॉल लावण्यात आले होते. सदर विविध स्टॉलच्या माध्यमातून जवळपास 25 ते 30 लाख रुपयाची आर्थिक उलाढाल झाली. यासोबतच दि. 26 व 27 डिसेंबर रोजी सायंकाळी 06 वा. च्या नंतर सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, या कार्यक्रमास महाराष्ट्रातील प्रसिध्द कलाकार सुरेश वाडकर, भारत गणेशपूरे, कुशल बद्रिके, हेमांगी कवी, ममता उईके, अर्जुन धोपटे, निरंजन बोबडे, माधुरी पवार, पद्मनाभन गायकवाड, आर. जे. आरव व आर. जे. रसीका सह गडचिरोली जिल्ह्रातील स्थानिक कलाकारांनी सुद्धा यात सहभाग घेत प्रेक्षकांना आपल्या कलेने मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमात मा. मुख्यमंत्री म. रा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत मान्यवरांनी सांस्कृतीक कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.

आज दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी आयोजित मॅरेथॅानमध्ये अतिशय जल्लोषपूर्ण व उत्साहाच्या वातावरणात गडचिरोली जिल्ह्रातील 14 हजारहुन अधिक युवक युवती व नागरिकांनी सहभाग नोंदवुन ही महा मॅरेथॉन पुर्ण केली. सदर गडचिरोली महामॅरेथॉन स्पर्धा मा. राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री गडचिरोली जिल्हा अॅड. श्री. आशिष जयस्वाल, मा. आमदार, अहेरी विधानसभा मतदान संघ श्री. धर्मरावबाबा आत्राम, मा. आमदार गडचिरोली विधानसभा मतदार संघ डॉ. श्री. मिलींद नरोटे, मा. अपर पोलीस महासंचालक (वि.कृ) डॉ. श्री. छेरिंग दोरजे, मा. विशेष पोलीस महानिरीक्षक नक्षल विरोधी अभियान, नागपूर श्री. संदिप पाटील, मा. पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र श्री. अंकित गोयल, मा. उप-महानिरीक्षक (अभियान) श्री. अजय कुमार शर्मा, मा. जिल्हाधिकारी श्री. अविश्यांत पंडा, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, गडचिरोली श्री. सुहास गाडे, मा. उप-वनसंरक्षक श्रीमती आर्या व्हि.एस. व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.

 

जिल्ह्रातील दुर्गम अतिदुर्गम भागातील युवक युवतींच्या कलागुणांना वाव मिळावा व विविध क्षेत्रात त्यांनी स्वत:चे नाव उंचवावे या उदात्त हेतूने गडचिरोली पोलीस दलाने वेगवेगळ्या स्पर्धा व मेळाव्यांच्या माध्यमातून नेहमीच पाठबळ दिले आहे. या मॅरेथॉन स्पर्धेमागचा उद्देश देखील हाच होता की, जिल्ह्रातील युवक युवतींनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेऊन एक चांगली कामगिरी करावी. आज झालेल्या स्पर्धेमध्ये स्पर्धकांचा उत्साह द्विगुणीत व्हावा याकरीता मा. राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री गडचिरोली जिल्हा श्री. आशिष जयस्वाल सोबत ईतर मान्यवरांनी या महामॅरेथॉन मध्ये प्रत्यक्ष भाग घेऊन मॅरेथॉन पूर्ण केली आहे. ही महा मॅरेथॉन स्पर्धा 3 कि.मी., 5 कि.मी., 10 कि.मी. व 21 कि.मी. अशा वेगवेगळ्या चार प्रकारात घेण्यात आली. प्रत्येक प्रकारात पुरुष गट, महिला गट असे गटनिहाय प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक देण्यात आलेे. 3 कि.मी. स्पर्धेत पुरुष गटात प्रथम- साहिल सोनुले, द्वितीय- आयुष गव्हारे व तृतीय- प्रणय साबळे तसेच महिला गटात प्रथम- शिवानी चौधरी, द्वितीय- मोनिका मडावी व तृतीय- श्रावणी तुम्मा यांनी क्रमांक पटकावला असून विजेत्यांना अनूक्रमे 11,000/-, 7000/- व 5000/- रु. रोख, ट्रॉफी, पदक व प्रमाणपत्र, 5 कि.मी. स्पर्धेत पुरुष गटात प्रथम- प्रणय सोरते, द्वितीय- राकेश नरोटे व तृतीय- संस्कार निकोडे तसेच महिला गटात प्रथम- संघवी कापकर, द्वितीय- क्रांती कोडापे व तृतीय- स्मृती चाकटवार यांनी क्रमांक पटकावला असून विजेत्यांना अनुक्रमे 15,000/-, 11000/- व 8000/- रु. रोख, ट्रॉफी, पदक व प्रमाणपत्र, 10 कि.मी. स्पर्धेत पुरुष गटात प्रथम- रोहन बुरसे, द्वितीय- साईनाथ पंुगाटी व तृतीय- सुरज बोटारे तसेच महिला गटात प्रथम- मुन्नी मडावी, द्वितीय- सानिया आदे व तृतीय- वैश्णवी मोहुर्ले यांनी क्रमांक पटकवला असून विजेत्यांना अनुक्रमे 21,000/-, 15000/- व 11000/- रु. रोख, ट्रॉफी, पदक व प्रमाणपत्र व 21 कि.मी. स्पर्धेत पुरुष गटात प्रथम- रोशन बोदलकर, द्वितीय- सौरभ कन्नाके व तृतीय- यश भांडेकर तसेच महिला गटात प्रथम- साक्षी पोलादवार, द्वितीय- प्रियंका ओक्सा व तृतीय- लक्ष्मी पंुगाटी यांनी क्रमांक पटकावला असून विजेत्यांना अनुक्रमे 51,000/-, 31000/- व 21000/- रु. रोख, ट्रॉफी, पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच जेष्ठ नागरिकांना प्रोत्साहनपर बक्षीस वितरीत करण्यात आले. सकाळी 06.10 वा. मॅरेथॉन स्पर्धा सुरु होऊन सकाळी 9.00 वा. सांगता करण्यात आली. महामॅरेथॉन स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांना टी-शर्ट, हुडी बॅग, पदक व सहभागीतेचे प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी स्पर्धकांचा उत्साह वाढावा यासाठी झुंबा डान्स, डीजे व अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती. तसेच या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण गडचिरोली पोलीस दलाच्या अधिकृत युट¬ुब चॅनेलवर करण्यात आले. सदर महा मॅरेथॅान स्पर्धेसाठी प्रायोजक म्हणून लॉयड्स मेटल्स सुरजागड, राणा शिपिंग कंपनी, मायाश्री ग्रुप ऑफ इंडस्ट्रिज वडसा, सुरजागड ईस्पात एटापल्ली, एसबीआय बँक गडचिरोली, अजयदिप कंन्स्ट्रक्शन, द गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. व एल. आय. सी. गडचिरोली यांनी हातभार लावून मोलाचा वाटा उचलला. सदर स्पर्धा ही जिल्हा परिषद मैदानापासून सुरु होऊन चंद्रपूर रोडवरील आयटीआय चौक, रिलायंस पेट्रोलपंप, कारगील चौक, इंदीरागंाधी चौक, ट्रेंड्स मॉल, बोधली चौक पासून परत जिल्हा परिषद मैदान या मार्गे घेण्यात आली.

 

यासोबतच गडचिरोली पोलीस दलास जिल्हा नियोजन समिती व पोलीस महासंचालक कार्यालय, मंुबई यांच्या वतीने माओवाद विरोधी अभियान पेट्रोलिंग करीता प्राप्त 32 चारचाकी वाहनांचा लोकार्पण सोहळा मा. श्री. देवेन्द्र फडणवीस, मुख्यमंत्री म. रा., यांच्या शुभहस्ते व मा. डॉ. पंकज भोयर, राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री वर्धा व भंडारा जिल्हा, श्री. आशिष जयस्वाल, राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री गडचिरोली जिल्हा आणि ईतर मान्यवर, वरिष्ठ अधिका­यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून पार पडला. तसेच पोलीस मुख्यालय परिसरात नूतन वरिष्ठ अधिकारी विश्रामगृहाचे भूमीपूजन मा. मुख्यमंत्री म.रा. यांचे हस्ते करण्यात आले.

 

उपरोक्त कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक, अहेरी श्री. कार्तिक मधीरा अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी. यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस अधीक्षक धानोरा श्री. अनिकेत हिरडे, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व शाखा प्रभारी अधिकारी, पोस्टे/उपपोस्टे/पोमकेंचे सर्व प्रभारी अधिकारी व दुय्यम अधिकारी व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.