*माजी राज्यमंत्री राजे अंब्रीशराव महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली.*

15

*माजी राज्यमंत्री राजे अंब्रीशराव महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली.*

 

*श्री गणेश भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे उदघाटन!*

 

*मुलचेरा:-* तालुक्यातील कोठारी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या कोलपल्ली येथे माजी राज्यमंत्री राजे अंब्रीशराव महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गणेश भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन कारण्यात आले होते.

 

या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत भाऊ कुत्तारमारे हे तर सहउदघाटक म्हणून सामाजिक कार्यकर्ते संतोष भाऊ उरेते हे होते.तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपसरपंच प्रफुल भाऊ नागूलवार हे होते.

 

अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अंब्रीशराव महाराज हे आपल्या क्षेत्रातील युवकांना विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग घेण्यास सातत्याने प्रोत्साहन देत असून,त्यांच्या माध्यमातून जिल्ह्याचे नाव राज्य व राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल व्हावे,यासाठी ते विशेष प्रयत्न करीत आहेत.

 

यावेळी या स्पर्धेसाठी विविध गावातून मोठ्या संख्येने स्पर्धाकांनी सहभाग नोंदविला होता.

 

तसेच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे प्रशांत आईलवार,प्रवीण आईलवार,भगवान पेंदाम,रवी चौधरी,कवडूजी चौधरी,दिलीप सिडाम,सत्यवान आत्राम,सैनुजी तलांडे तसेच मोठया संख्येने गावातील नागरिक उपस्थित होते.

 

या कार्यक्रमाचे संचालन व आभार मारोती पेंदाम यांनी केले.