*अटल स्मृती संमेलनातून राष्ट्रसेवेचा संकल्प अधिक दृढ – आमदार मिलिंद नरोटे*
जिल्हा प्रतिनिधी वृत्तवानी न्यूज
दिं: 28/12/2025
*गडचिरोली* भारतीय जनता पार्टी, गडचिरोलीच्या वतीने भारतीय राजकारणातील महामेरू, थोर राष्ट्रनेते आणि प्रेरणास्थान श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त *‘अटल स्मृती संमेलन :* *प्रेरणादायी विचार’* या कार्यक्रमाचे आयोजन कर्तव्य कक्ष १, गडचिरोली येथे करण्यात आले. या संमेलनास *आमदार मिलिंद नरोटे* यांनी उपस्थित राहून अटलजींच्या स्मृतींना भावपूर्ण अभिवादन केले व उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
*यावेळी बोलताना आमदार मिलिंद नरोटे म्हणाले की,* *“अटलजींनी नेहमीच पक्षापेक्षा देशाला सर्वोच्च स्थान दिले. ‘राष्ट्र प्रथम’ हा मंत्र त्यांनी संपूर्ण देशाला दिला*. सिद्धांतहीन राजकारण त्यांना कधीच मान्य नव्हते. त्यामुळेच त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन समाजकार्यात प्रामाणिकपणे कार्य करणे ही आजची गरज आहे.”
अंत्योदयाचा विचार मांडत त्यांनी सांगितले की, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवणे, हेच अटलजींना खरे अभिवादन ठरेल. अटलजींच्या कविता व विचार संघर्षाच्या काळात सदैव ऊर्जा देणारे असून *“हार नहीं मानूंगा,* *रार नहीं ठानूंगा”* ही त्यांची जीवनदृष्टी प्रत्येक कार्यकर्त्याने आत्मसात करावी, असे आवाहन त्यांनी केले.
*पारदर्शक, लोकाभिमुख आणि सुशासनाचा जो आदर्श मार्ग अटलजींनी दाखवून दिला, त्याच मार्गावरून चालत गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत, असेही आमदार नरोटे यांनी ठामपणे सांगितले. अटलजींच्या ध्येयधोरणातून मिळणारी प्रेरणा समाजकार्यात सदैव मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.*
या संमेलनाच्या माध्यमातून अटलजींच्या स्मृतींना उजाळा देत, त्यांनी दिलेला राष्ट्रसेवेचा वारसा अधिक सक्षमपणे पुढे नेण्याचा संकल्प उपस्थित सर्व मान्यवर व कार्यकर्त्यांनी केला.
कार्यक्रमास प्रमुख वक्ते श्री. यादवजी गहाणे, माजी आमदार डॉ. नामदेवजी उसेंडी, भाजपाचे ज्येष्ठ नेते श्री. रमेशजी भुरसे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री. अनिलजी पोहनकर, भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक श्री. अनिलजी कुनघाडकर, भाजपा तालुकाध्यक्ष श्री. दत्तूजी सूत्रपवार यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.





