*ढेकणी येथे बालिका दिन साजरा*

23

*ढेकणी येथे बालिका दिन साजरा*

ढेकणी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकणी येथे उत्साहात बालिका दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन मट्टामी यांच्या अध्यक्षतेखाली व शाळेचे मुख्याध्यापक राजेश्वर मुलकलवार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमात मुलींनी देशभक्तीपर गीत, भाषण, कवितावाचन तसेच लघुनाटिकेद्वारे बालिकांचे महत्त्व, शिक्षणाची गरज आणि समानतेचा संदेश प्रभावीपणे मांडला. उपस्थितांनी बालिकांना प्रोत्साहन देत आत्मविश्वास, स्वावलंबन आणि शिक्षण यांचे महत्त्व स्पष्ट केले.

या वेळी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सुखदेव कुमोटी, अंगणवाडी सेविका सुमित्रा कुमोटी, रूपाली मट्टामी, कौशल्या नरोटे तसेच शाळेतील व अंगणवाडीतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थी व विद्यार्थिनींना अल्पोपहार वाटप करून बालिका दिनानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.