रणसिंग महाविद्यालय परिसर स्वच्छ
इंदापूर प्रतिनिधी गणेश धनवडे
कळंब ता. इंदापूर येथील विश्वासराव रणसिंग इंदापूर प्रतिनिधी महाविद्यालयात एक दिवसीय स्वच्छता मोहीमेचे आयोजन संस्थेचे सचिव विरसिंह रणसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने विश्वासराव रणसिंग महाविद्यालय परिसर स्वच्छ करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक काळंगे,उपप्राचार्य प्रा ज्ञानेश्वर गुळिग व डाॅ.प्रशांत शिंदे यांनी भेट दिली.उपप्राचार्य डॉ.प्रशांत शिंदे राष्ट्रीय सेवा योजना आयुष्यभराची शिदोरी देते. भिंती बाहेरच्या शिक्षणासाठी राष्ट्रीय सेवा योजना आहे. प्राचार्य डॉ अशोक काळंगे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्याची माहिती सांगून एकत्र येऊन काम करताना सामाजिक बांधिलकी, नेतृत्व गुण वाढीस लागतात आणि देशाच्या,समाजाच्या विकासासाठी हि योजना महत्वाची असल्याचे सांगितले.
यावेळी डॉ. संदीप पवार,प्रा.धुळदेव वाघमोडे
समिती सदस्य डॉ अमर वाघमोडे,प्रा रवी गायकवाड,प्रा.सोमनाथ चव्हाण,प्रा महादेव माळवे प्रा.आकांक्षा मेटकरी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा राजेंद्रकुमार डांगे यांनी केले
आभार प्रा सुवर्णा बनसोडे यांनी व्यक्त केले.






